ETV Bharat / city

Raosaheb Danve Criticise State Government : ... तर राज्य सरकारची पंचाईत होईल - केंद्रीय राज्यमंत्री दानवे - राज्य सरकारची पंचाईत होईल

राज्य सरकार किराणा दुकान व सुपर मार्केटमधून आज वाईन विकत आहे उद्या बीअर आणि दारूही विकतील. महसूलवाढीसाठी वाईन विक्री हा निर्णय चुकीचा आहे. इतर राज्यात तसे होत असेल पण, महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारे नाही ( Raosaheb Danve Criticise State Government ). महसूल वाढीसाठी सरकारकडे अनेक मार्ग आहेत. यामुळे राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यायला हवा, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Central Minister of State Raosaheb Danve ) म्हणाले.

रावसाहेब दानवे
रावसाहेब दानवे
author img

By

Published : Jan 29, 2022, 3:55 PM IST

पुणे - केंद्र सरकारची राज्य सरकारकडे किती रुपयांची थकबाकी आहे याचा हिशोब काढला तर राज्य सरकारची पंचाईत होईल, असा निशाणा ( Raosaheb Danve Criticise State Government ) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Central Minister of State Raosaheb Danve ) यांनी राज्य सरकारवर साधला. राज्य सरकार सतत जीएसटीच्या पैशावरुन केंद्रावर टीका करत असते. मी स्वतः कोळसामंत्री आहे. राज्य सरकारकडे कोळशाचे तब्बल तीन हजार कोटी रुपये थकीत आहेत. आम्ही याबाबत कधी विचारणा केली का, कोळसा पुरवठा थांबवला का, असा सवाल उपस्थित करत दानवे म्हणाले, ज्या पद्धतीने जीएसटीचा परवाना देण्यात येतो त्या पद्धतीने समप्रमाणात सर्व राज्यांना देण्यात येईल.

बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

आज वाईन विकत आहेत, उद्या बीअर अन् दारू विकतील - राज्यसरकारने वाईनबाबत घेतलेल्या निर्णयावर विरोधी पक्षाच्यावतीने राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यावर आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) म्हणाले, वाईन आणि दारु यामध्ये फरक आहे. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना विचारले असता ते म्हणाले, वाईन आणि दारू या दोन्हीमध्ये अल्कोहोल असते. राज्य सरकार किराणा दुकान व सुपर मार्केटमधून आज वाईन विकत ( Wine At Supermarket ) आहे. उद्या बीअर आणि दारूही विकतील. आमच्या काळात आम्ही काही जिल्हे दारूमुक्त केले होते. या सरकारने त्या जिल्ह्यातील दारुबंदी उठवली.

सरकारला महसूल वाढीसाठी अनेक मार्ग - महसूलवाढीसाठी वाईन विक्री हा निर्णय चुकीचा आहे. इतर राज्यात तसे होत असेल पण, महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारे नाही. महसूल वाढीसाठी सरकारकडे अनेक मार्ग आहेत. पण, महसूल वाढविण्यासाठी दारू विकून पैसे उभारणे हे पर्याय नाही. यामुळे राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यायला हवा, असेही दानवे म्हणाले.

तो राज्य सरकारला एक चपराक आहे - बारा आमदार निलंबनाबाबत सर्वाच्च न्यायालयाने ( Supreme Court on Suspended MLA ) जो निर्णय दिला तो राज्य सरकारला एक चपराक आहे. अशा मनमानी पद्धतीने घटनाबाह्य निर्णय करण्याचा अधिकार या राज्य सरकारला नाही. दिल्लीत ज्या खासदाराचे निलंबन केले गेले ते वर्षभरासाठी नाही, असे यावेळी दानवे म्हणाले.

हेही वाचा - TET Exam Scam : टीईटी घोटाळ्यात आयएएस अधिकाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.