पुणे - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जेव्हा पासून पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे, तेव्हापासून त्यांना विरोधकांकडून टिकेला सामोरे जावे लागत आहे. मात्र आज गडकरींनी देखील चंद्रकांत पाटील यांना तीन तासात कोल्हापूरला जाता येईल अशी मेट्रो शोधली असल्याचे मिश्कील भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्यावनंतर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकल्याचे दृश्य पाहायला मिळाले आहे.
पुण्यात सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाईम थेटर येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपूल निर्मितीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात मेट्रोच्या कामांचा उल्लेख करताना पाटलांना उद्देशून एक मिश्कील टिपन्नी केली.
काय म्हणाले गडकरी
पुण्याच्या मेट्रोची कॉस्टही 380 कोटी प्रति किलोमीटर आहे. नागपूरची 350 कोटी प्रतिकिलोमीटर आहे. हा खर्च खुप मोठा आहे. मात्र आता मी एक नवीन मेट्रो शोधली आहे, जिचा खर्च किलोमीटरला 1 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे ती मेट्रो पुण्यात कन्सल्टंट चार्ज न घेता बनवायला तयार आहे. पुणे ते कोल्हापूर, पुणे ते सोलापूर, पुणे ते अहमदनगर, पुणे ते बारामती अशी ती आठ डब्यांवर मेट्रो चालणार आहे. त्या मेट्रोला 4 इंटरनॅशनल डबे असून फ्री वायफायची सुविधा देण्यात आली आहे. तसेच या मेट्रोने प्रवास करण्यासाठी तिकीटाचे दर एसटीच्या दरा इतकं असतील, या मेट्रोचा स्पीड हा ताशी 140 किमी असल्याचे सांगत गडकरींनी चंद्रकांत दादांना उद्देशून बोलताना म्हणाले की, या वेगामुळे चंद्रकांत दादांनाआता पाऊणे तीन तासात कोल्हापूरला जाता येईल. याच मिश्लीक वक्तव्यांने व्यासपीठ आणि उपस्थितामध्ये काही क्षण हशा पिकल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
केंद्रीय मंत्रालया बऱ्याच काळापासून भारतीय वाहतूक क्षेत्रासाठी जैव-इंधन वाहनांवर भर देत आहेत. त्यादृष्टीने नितीन गडकरी यांनी येत्या तीन ते चार महिन्यात जैव इंधनावर चालणाऱ्या वाहन निर्मितीचे आदेश जारी करणार असल्याचेही आज पुण्यात स्पष्ट केले.
हेही वाचा - बेधडक नितीन गडकरी : पत्नीला न सांगताच 'सासऱ्या'च्या घरावर चालवला होता 'बुलडोझर'!!
हेही वाचा - दिव्याखालीच अंधार! मंत्रालयापासून 81 किमीवर असलेल्या 'या' आदिवासी पाड्यात आजही ना वीज, ना रस्ते...