ETV Bharat / city

अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात पुण्यात गुन्हा दाखल, गांधी कुटुंबीयांविषयी केले वादग्रस्त विधान - संगीता तिवारी पुणे

पायल रोहतगी हिने पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, त्यांचे कुटुंबीय आणि काँग्रेस परिवार याविषयी खोटा आणि बदनामीकारक व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड केला होता. या माध्यमातून हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला आहे.

अभिनेत्री पायल रोहतगी
अभिनेत्री पायल रोहतगी
author img

By

Published : Sep 1, 2021, 10:45 AM IST

Updated : Sep 1, 2021, 5:35 PM IST

पुणे - सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी अभिनेत्री पायल रोहतगी हिच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू व गांधी कुटुंबीयाबाबत चुकीचे व आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती.

माहिती देताना पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे

हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न?

पायल रोहतगी हिने पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, त्यांचे कुटुंबीय आणि काँग्रेस परिवार याविषयी खोटा आणि बदनामीकारक व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड केला होता. या माध्यमातून हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला आहे. सुरुवातीला सायबर पोलीस ठाण्यात हा अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तिथून तो शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

व्हिडिओ तयार करणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल

शिवाजीनगर पोलिसांनी पायल रोहतगी आणि व्हिडिओ तयार करणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भादवी 153 अ 500, 505/2, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक माने या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, यापूर्वीही पायल रोहतगीने छत्रपती शिवाजी महाराज, तसेच महात्मा गांधी यांच्याबद्दलही फेसबुकवर आक्षेपार्ह लिखान केलेले होते. त्यावेळी तिच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून झाली होती.

हेही वाचा - शिवराळ अभिनेत्री पायल पुन्हा खातेय तुरूंगाची हवा : सुंभ जळेल पण पीळ जात नाही

Last Updated : Sep 1, 2021, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.