ETV Bharat / city

Case Field Against IPS Rashmi Shukla : रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल - संजय काकडे

राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची नावे बदलून त्यांच्या फोनचे टॅपिंग केले जात होते. संजय काकडे यांचे नाव तरबेज सुतार, बच्चू कडू यांचे नाव निजामुद्दीन बाबू शेख, नाना पटोले यांचे नाव अमजद खान तर आशिष देशमुख यांचे नाव रघु चोरगे म्हणून टॅप केले जात होते, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली आहे. या व्यक्ती पुण्यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अमली पदार्थांची विक्री करत आहेत, असे सांगून या व्यक्तींचा फोन टॅप करण्यात येत होते.

आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला
आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला
author img

By

Published : Feb 26, 2022, 3:02 PM IST

Updated : Feb 26, 2022, 7:07 PM IST

पुणे - बेकायदेशीरपणे टेलीफोन टॅपिंग केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरू असतानाच पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला यांच्यावर हा गुन्हा दखल करण्यात आला ( Case Field Against IPS Rashmi Shukla ) आहे. सध्या त्या केंद्रीय प्रती नियुक्तीवर हैदराबाद येथे कर्यरत आहेत.

याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे ( IPS Sanjay Pandey ) यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाकून अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय सांगतो फोन टॅपिंगचा कायदा..? - इंडियन टेलिग्राफ कायदा १९८५ नुसार राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणणाऱ्या व्यक्तीचा, दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीचा, आंतरराष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या व्यक्तीचा, संवेदनशील कृती करणाऱ्या व्यक्तीचा, परदेशी मित्र राष्ट्रांच्या हिताला धोका पोहोचवणाऱ्या व्यक्तीचा फोन टॅप करण्याची अनुमती देण्यात येते. मात्र, यापैकी कोणतेही सबळ कारण नसताना राज्यातील राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले गेल्याची माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली.

नावे बदलून फोन टॅपिंग - राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची नावे बदलून त्यांच्या फोनचे टॅपिंग केले जात होते. संजय काकडे यांचे नाव तरबेज सुतार, बच्चू कडू यांचे नाव निजामुद्दीन बाबू शेख, नाना पटोले यांचे नाव अमजद खान तर आशिष देशमुख यांचे नाव रघु चोरगे म्हणून टॅप केले जात होते, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली आहे. या व्यक्ती पुण्यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अमली पदार्थांची विक्री करत आहेत, असे सांगून या व्यक्तींचा फोन टॅप करण्यात येत होते.

सूड भावनेने कारवाई नाही - राजकीय व्यक्तींचे फोन चुकीच्या पद्धतीने टॅप करणे आयोग्य आहे. सरकारी सेवेतील अधिकाऱ्यांनी अथवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अशा गोष्टींचे भान बाळगले पाहिजे आणि जबाबदारीने वागले पाहिजे. ही कारवाई कोणताही सूड भावनेने करण्यात येत नसल्याचेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - Thieves Police Face To Face : पुण्यात पोलीस चोरटे समोरासमोर...पुढे असा झाला थरार

Last Updated : Feb 26, 2022, 7:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.