ETV Bharat / city

Girish Mahajan Complaint : गिरीश महाजन यांचे तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात तक्रार

author img

By

Published : Mar 23, 2022, 12:09 PM IST

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणात चव्हाण यांची चौकशीची मागणी ( BJP MLA Girish Mahajan complaint against Chavan) केली आहे. भाजपाचे आमदार गिरीश महाजन यांनी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही लेखी तक्रारीमध्ये मागणी केली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी महाजन यांचा लेखी अर्ज सीआयडीकडे दिला आहे.

Girish Mahajan Complaint
गिरीश महाजन

पुणे - भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ( shivajinagar police pune ) ठाण्यात लेखी तक्रार ( BJP MLA Girish Mahajan complaint against Chavan ) दाखल केली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणात चव्हाण यांच्या चौकशीची या लेखी तक्रारमध्ये मागणी केली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी महाजन यांचा लेखी अर्ज सीआयडीकडे दिला आहे.

काय आहे प्रकरण? - विशेष सरकारी वकील हे सरकार भाजपचे आमदार गिरीश महाजन आणि विरोधकांना विविध प्रकरणात गोवण्यासाठी षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्हिडिओ बॉम्ब टाकला. यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनचा समावेश आहे. फडणवीसांच्या या आरोपानंतर तत्कालीन विशेष सरकारी वकील यांनी त्यांचे हे आरोप फेटाळून लावले आहे. तर या प्रकरणात स्टिंग ऑप्रेशन करणाऱ्या तेजस मोरे विरोधात प्रवीण चव्हाण यांनी तक्रार दाखल केलेली आहे. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी फडणवीसांनी केली होती. पण हे प्रकरण सीबीआय ऐवजी सीआयडीकडे देण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलीय.

हेही वाचा - Salman Khan : अभिनेता सलमान खानला अंधेरी कोर्टाचे समन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.