पुणे - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये तो आवाज संजय राठोड यांचा असल्याचे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आहोत. या प्रकरणावर आम्ही विविध प्रश्न उपस्थित केले. परंतु अजूनही आम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे पोलिसांकडून मिळालेली नाहीत. पहिल्या दिवसांपासूनच या प्रकरणात पुणे पोलिसांच्या हालचाली संशयास्पद असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला.
दरम्यान आज सकाळपासून पूजा चव्हाण आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव चर्चेत आहे. पूजा चव्हाणच्या फोन कॉल्स रेकॉर्डिंगवरून मृत्यूच्या आधी ती ज्या व्यक्तीसोबत संपर्कात होती ती व्यक्ती संजय राठोडच असल्याची प्रथम दर्शनी माहिती समोर येत आहे. बंजारा भाषेत त्या दोघांमध्ये संभाषण झालं असल्याचं बोललं जातंय. माध्यमांमध्ये या बातम्या आल्यानंतर संजय राठोड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या सर्व प्रकरणावर चित्रा वाघ यांनी ही प्रतिक्रिया दिली.
पूजा चव्हाण प्रकरणात पहिल्या दिवसांपासूनच पुणे पोलिसांच्या हालचाली संशयास्पद, चित्रा वाघ यांचा आरोप - चित्रा वाघ
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये तो आवाज संजय राठोड यांचा असल्याचे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आहोत. या प्रकरणावर आम्ही विविध प्रश्न उपस्थित केले. परंतु अजूनही आम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे पोलिसांकडून मिळालेली नाहीत. पहिल्या दिवसांपासूनच या प्रकरणात पुणे पोलिसांच्या हालचाली संशयास्पद असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला.