पुणे - आज भल्या पहाटे एक रानटी गवा अवतरल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोथरुड परिसरातील महात्मा सोसायटीत या गव्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोथरूडसारख्या दाट लोकवस्तीत हा प्राणी दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महात्मा सोसायटीतील गल्ली क्रमांक एकमध्ये आज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना हा गवा दिसला. सुरुवातीला गाय किंवा म्हैस असावी असे समजून स्थानिक नागरिकांनी दुर्लक्ष केले. परंतु काही वेळानंतर तो गवा असल्याचे लक्षात आल्यानंतर एकच धांदल उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने याची माहिती वन विभागाला कळवली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा - सिरमने मागितली लसीच्या मान्यतेसाठी आपत्कालीन परवानगीव्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा - कौमार्य चाचणीची अनिष्ट प्रथा झुगारत आणखी एक विवाह