पुणे : गेली दोन वर्ष कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्वच सण उत्सव निर्बंधामध्ये साजरा करावे लागले. यंदा मात्र निर्बंध मुक्त असल्याने मोठ्या उत्साहाने सण उत्सव साजरे केले जात आहे. येत्या 21 ऑक्टोबर पासून सर्वत्र दिवाळीला सुरवात होणार आहे. पुण्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजल्या (Diwali in Pune) आहेत. यंदाच्या दिवाळीत इच्छुकांकडून मोठी ऑर्डर देण्यात आल्याने आकाश कंदील बनविणाऱ्यांसाठी 'अच्छे दिन' आले (Big order for Akash Kandil) आहेत.
आकाश कंदील बनवायला सुरूवात - राज्यात पुण्यासह विविध महापालिकेत प्रशासक राज्य असून कधीही महापालिका निवडणूक जाहीर होणार आहे. गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुकांकडून विविध सण उत्सवात मतदारांसाठी विविध कामे केले जात आहे. यंदाच्या दिवाळीत आपापल्या प्रभागात आपल्या नावासह मोठ-मोठी आकाश कंदील लावण्यात येणार आहेत त्यामुळे आकाश कंदील बनविण्याचे काम करणाऱ्या लोकांना यंदा मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. यावर्षी दरवर्षीपेक्षा 15 दिवस अगोदर आकाश कंदील बनविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती आकाश कंदील बनविणारे देविदास पवार यांनी दिली (Akash Kandil Maker Pune) आहे.
यंदाची दिवाळी गोड होणार - गेली दोन वर्ष सर्वांनाच मोठा फटका होता. सर्वच सण उत्सव निर्बंधामध्ये साजरा करावे लागले होते. यंदा मात्र निर्बंध नसल्याने मोठ्या उत्साहात सण उत्सव साजरे करण्यात आले. वाढत्या महागाईचा फटका जरी बांबूवर बसला असला, तरी इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणात यंदाच्या दिवाळीत मोठमोठी आकाश कंदील बनविण्याचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी ही गोड होणार असल्याचं देखील यावेळी पवार यांनी सांगितलं (Akash Kandil Diwali) आहे.