रायगड - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील किमी ४० येथे पहाटे साडे सहा वाजता ६ वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका कारचा दोन मोठ्या वाहनांच्यामध्ये चेंदामेंदा झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर वाहनांमधील ३ जण गंभीर तर ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. दोन कंटेनर, दोन कार, टेम्पो व ट्रक अशा सहा वाहनांचा हा अपघात आहे. सर्व वाहने मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती समजताच आयआरबी, देवदूत यंत्रणा, लोकमान्यची यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला संस्थेचे पथक, बोरघाट व खोपोली पोलीस यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेत मयत व जखमी यांना वाहनांमधून बाहेर काढले.
सहा गांड्यांचा अपघात -
मुंबईकडे जात असताना (MH 46 AR 3877) या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने कंटेनरने पुढे जाणा-या (MH13 BN 7122) या स्वीफ्ट कारला धडक दिली. त्यामुळे ही कार पुढील टेम्पोवर (MH 10 AW 7611) धडकली. टेम्पोने पुढे जाणाऱ्या (MH 21 BO 5281) या कारला जोरदार धडक दिली. (या कार मधील तीन प्रवासी रा. जालना किरकोळ जखमी). वेन्यु कारने पुढे जाणाऱ्या कंटेनर (MH 46 BM 5254) जोरदार धडक दिली. मात्र या कंटेनर चालक निघुन गेला. पवन अग्रवाल, मितेश वडोदे, अस्लम शेख तिघे ही रा. जालना, वेन्यु कार मधील प्रवासी सुखरुप बचावले. तर दामू गावडे, सुनीता गावडे, श्रेयस खरात, नवनाथ खरात, माया खरात रा. कळंबोली जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पुणे मुंबई लेनवर किमी 40.100 येथे झाला आहे. सर्व वाहने बाजुला काढल्याने वाहतूक पुर्वपदावर येत आहे. मात्र अपघात झाल्यानंतर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. अतिशय भीषण आणि वेदनादायी असा अपघात झाला असून यामध्ये दोन्ही कारचा चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच नवी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.
मृतांची नावे
- गौरव खरात (वय 36)
- सौरभ तुळसे (वय 32)
- सिद्धार्थ राजगुरू (वय 31)