बारामती विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बारामती तालुका पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक Motorcycle thieves arrested by Baramati police केली. आरोपींकडून तब्बल 27 मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या Baramati Police Seized Stolen Motorcycles आहेत. मागील काही महिन्यांपासून बारामती तालुका पोलीस ठाणे Baramati Taluka Police station हद्दीतील सुभद्रा मॉल, महिला हॉस्पीटल, व्ही.पी कॉलेज, पेन्सिल चौक परिसरातून मोटार सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते.
सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे चोरीचा छडा वाढत्या चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी गुन्ह्याला आळा घालण्याची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, गुन्हे शोध पथकाचे पो हवालदार राम कानगुडे,पो.नाईक अमोल नरूटे,पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय मदने शशिकांत दळवी,दिपक दराडे यांना दिली होती. त्यानुसार या पथकाने पोलीस रेकॉर्डवरील मोटर सायकल चोरी करणारे आरोपी तसेच बारामती शहरपरिरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारावर संशयिताना ताब्यात घेत वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून बोलते केले. या गुन्ह्यात विजय अशोक माने वय १९ वर्षे, प्रदीप रघुनाथ साठे वय २२ वर्षे, प्रेम सुभाष इटकर वय १९ वर्षे तिघे रा. मिलींदनगर, जामखेड, जि. अहमदरनगर, संतोष तुकाराम गाडे वय ४२ वर्षे रा. अंमळनेर, ता. पाटोदा, जि.बीड यांना ताब्यात घेतले आहे.
आरोपी सराईत गुन्हेगार हे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर बारामती तालुका, वालचंदनगर, जामखेड,कर्जत पोलीस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न, चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत स्कुटी, पल्सर, स्पेलंडर अशा वेगवेगळया कंपनीच्या १३ लाख ५० हजार रूपये किंमतीच्या २७ दुचाकी मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत.सदर चोरीस केलेल्या मोटार सायकली पैकी काही मोटार सायकली आरोपीनी पुरून ठेवल्या होत्या त्या ही हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पो. हवालदार राम कानगुडे, पो.नाईक अमोल नरूटे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय मदने, शशिकांत दळवी, दिपक दराडे यांनी केली आहे.
हेही वाचा Terror Funding दहशतवादी संघटनांना निधी पुरवणाऱ्या हवाला ऑपरेटरला दिल्लीत अटक, मुंबई कनेक्शन उघड