पुणे : देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या कार्यकर्त्यांना देशविघातक कृत्य केल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने ( National Investigation Agency ) अटक केल्यानंतर व पुण्यात झालेल्या घोषणाबाजीवरून संशय निर्माण झाल्यानंतर, आता दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( Popular Front of India ) या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे. पीएफआयवर बंदी घातल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज पुण्यातील अलका चौक येथे फटाके फोडून तसेच लाडू वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित : यावेळी मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, अजय शिंदे, सारंग सराफ, बाबू वागसवकर, मनसेच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्या व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विविध कार्यालयांवर छापेमारी : मागच्या आठवड्यात केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विविध कार्यालयांवर छापेमारी टाकण्यात आली होती. पुण्यात देखील अशाच पद्धतीची छापेमारी करण्यात आली होती.आणि त्याच्या निषेधार्थ पीएफआय च्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आलं होत.आणि या आंदोलनाच्या वेळी पाकिस्तान झिंदाबाद चे नारे लगवण्यात आले होते.यानंतर मनसे तर्फे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या निषेधार्थ तसेच संघटनेवर बंदी यावी म्हणून आंदोलन करण्यात आले होते.आणि आज बंदी आणल्यानंतर अलका चौकात जल्लोष साजरा करण्यात आलं आहे.
मनसे नेते बाबू वागसकर म्हणाले : पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर मनसेच्या आंदोलनमुळे त्वरीत बंदी घातली गेली. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वप्रथम ही भूमिका मांडली होती आणि मग आम्ही मोठ आंदोलन केलं आणि सरकारला याची दखल घ्यावी लागली. आज आम्ही पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर बंदी घातली म्हणून जल्लोष साजरा करत आहोत. अस यावेळी मनसे नेते बाबू वागसकर यांनी म्हटल आहे.