ETV Bharat / city

Bamboo India : पुण्यातील 'बांबू इंडिया' पोहचले Shark Tank India कार्यक्रमात, वाचा स्पेशल रिपोर्ट!

प्रत्येक क्षेत्रात स्टार्टअप कंपन्या आपली नवीन ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात असते. आपल्या कंपनीचं वेगळेपण निर्माण करण्यासाठी या स्टार्टअप कंपन्या आपल्या कंपनीला कल्पकतेची जोड देत असतात. पुण्यात देखील एक असेच स्टार्टअप आहे. बांबूंपासून बनवली जाणारी उत्पादनं थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याच्या हेतूनं या स्टार्टअपचे सर्वेसर्वा योगेश आणि अश्विनी शिंदे Shark Tank India या ( Bamboo India in Shark Tank India ) प्रसिद्ध कार्यक्रमात सहभागी झाले. त्यानिमित्तानं 'बांबू इंडिया'चा ( Start-up 'Bamboo India' ) प्रवास नेमका कसा होता? पाहा या स्पेशल रिपोर्टमधून.

Bamboo India startup from Pune reaches Shark Tank
Bamboo India : पुण्यातील 'बांबू इंडिया' पोहचले Shark Tank India कार्यक्रमात, वाचा स्पेशल रिपोर्ट!
author img

By

Published : Feb 21, 2022, 7:25 AM IST

पुणे - संपूर्ण जगासह देशात सध्या स्टार्टअपचा बोलबाला सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात स्टार्टअपच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. प्रत्येक स्टार्टअप कंपनी ही काहीतरी वेगळे प्रोडक्ट बनवून बाजारात आपल स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असते. प्रत्येक क्षेत्रात स्टार्टअप कंपन्या आपली नवीन ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात असते. आपल्या कंपनीचं वेगळेपण निर्माण करण्यासाठी या स्टार्टअप कंपन्या आपल्या कंपनीला कल्पकतेची जोड देत असतात. पुण्यात देखील एक असेच स्टार्टअप आहे. जे आधुनिक युगात काहीतरी वेगळ करू पाहत आहे. बांबूंपासून बनवली जाणारी उत्पादनं थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याच्या हेतूनं या स्टार्टअपचे सर्वेसर्वा योगेश आणि अश्विनी शिंदे Shark Tank India या ( Bamboo India in Shark Tank India ) प्रसिद्ध कार्यक्रमात सहभागी झाले. त्यानिमित्तानं 'बांबू इंडिया'चा ( Start-up 'Bamboo India' ) प्रवास नेमका कसा होता? पाहा या स्पेशल रिपोर्टमधून.

पुण्यातील 'बांबू इंडिया' स्टार्टअप

पुण्यातील बांबू इंडिया ही कंपनी प्लास्टिकचा उपयोग होत असलेल्या ठिकाणी प्लास्टिक ऐवजी बांबूपासून वापरलेल्या वस्तू बनवत आहे. पुण्यातील बांबू इंडिया हे स्टार्टअप बांबूपासून अनेक गोष्टी बनवत आहे. टूथ ब्रश, पेन स्टँड, मोबाईल कवर, स्पीकर अश्या अनेक गोष्टी बनवत ही कंपनी प्लास्टिकला पर्याय शोधत आहे.

2016 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने आता पर्यंत जवळपास 20 लाख किलो प्लास्टिक हे नष्ट केले आहे. प्लास्टिक ऐवजी बांबूच्या वस्तू बनवल्या आहेत. योगेश शिंदे आणि त्यांची पत्नी अश्विनी यांनी सुरु केलेले बांबू इंडिया हे स्टार्टअप, बांबूशी निगडित, इको-फ्रेंडली उत्पादने बनवते. तसेच प्लास्टिकच्या वस्तूंना बांबूने बदलण्याच त्यांचं उद्दिष्ट आहे.

शेती हा भारताचा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीला अनेक जोडधंदे देखील आहेत. अनेक शेतकरी हे आधुनिक युगात स्वतःला अपडेट करत आपल्या शेतीतून उत्पन्न होणार रॉ मट्रेल हे साता समुद्रापार पोहोचवत आहे. अनेक देशांमध्ये आजकाल तिथले शेतकरी ज्या पद्धतीने शेतीच्या नवीन पध्दतींचा अवलंब करीत आहेत. तशाच शेतीच्या नवीन पद्धती आपणही आपल्या देशात वापरायला हव्यात म्हणून अनेक जण प्रयत्नात देखील असतात.

4000 शेतकऱ्यांना दिला रोजगार -

पुण्यातील बांबू इंडिया या स्टार्टअपने आत्तापर्यंत 4000 शेतकऱ्यांना रोजगार देखील दिला आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बांबू उत्पादक देश आहे आणि बांबूच्या सर्वात मोठ्या आयातदारांपैकी एक आहे. फक्त टूथब्रश उत्पादकांसाठी काम करत असलेले हे स्टार्टअप आता थेट लोकांपर्यंत पोहचत आहे. आपल्या कल्पनेला आणि प्रयत्नांना विचारांची आणि आधुनिकतेची जोड देत शार्क टँक इंडिया या रियालिटी शो पर्यंत पोहचलेले हे स्टार्टअप भारतात एक वेगळा ठसा उमटवत आहे.

हेही वाचा - CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांची राष्ट्रपतींकडे मराठी भाषेला 'अभिजात भाषेचा' दर्जा देण्याची मागणी; पाठवले 1,25,000 पोस्टकार्ड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.