पुणे - ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. लागू यांच्या निधनानंतर त्यांच्या वाहनचालकालाही अश्रू अनावर झाले. आज (मंगळवार) संध्याकाळी तर त्यांना मी भेटलो होतो, तेव्हा स्वप्नातही असे काही घडेल असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया वाहनचालकाने देत त्याला अश्रू अनावर झाले.
हेही वाचा - 'मराठी रंगभूमीला सुवर्ण काळात आणणाऱ्या दिग्गजांपैकी डॉ. लागू हे एक'
नेहमीप्रमाणे आज(मंगळवार) सायंकाळी डॉ श्रीराम लागुंना मी फिरवून आणले होते. तेव्हा मी त्यांना शेवटचं पाहतोय असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, अशा शब्दात लागू यांचे वाहनचालक बबन माझिरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा - नाट्यसृष्टीतील धगधगत पर्व शांत झाल - किरण यज्ञोपवीत
माझिरे म्हणाले, की मागील 25 वर्षांपासून मी लागू यांच्याकदे वाहनचालक (ड्रायव्हर) म्हणून काम करतो. नेहमीप्रमाणे आज (मंगळवार) सायंकाळी मी त्यांना गाडीतून फिरवून आणले. त्यावेळी त्यांना काही त्रास होत नव्हता, मात्र मागील काही वर्षांपासून प्रकृतीत चढ -उतार सुरू होतेच. काम संपवून घरी गेल्यावर प्रकृती बिघडल्याचा दीपाताईंचा फोन आला. मी आलो आणि मला अशी दुर्दैवी घटना घडल्याचे समजले. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट दिवस असल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले.