ETV Bharat / city

नर्सचे कपडे परिधान करून रूग्णालयातुन बाळ पळवले, 24 वर्षीय महिलेला अटक

ससून रुग्णालयातील वार्ड क्रमांक 74 मध्ये दोन मुलींसह आली होती. मोठ्या मुलीची सोनोग्राफी करण्यासाठी त्या रुग्णालयात आल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास डॉक्टरांनी या महिलेला आतमध्ये बोलावल्यामुळे त्यांनी तीन महिन्याच्या छोट्या मुलीला ओळखीच्या महिलेजवळ ठेवले. याच दरम्यान नर्सच्या वेशभूषेत आलेल्या एका महिलेने बाळाला माझ्याजवळ द्या, म्हणत तिच्याकडून बाळ घेतले. त्यानंतर बाळाचे अपहरण करून पळ काढला.

बाळ पळवले
बाळ पळवले
author img

By

Published : Sep 10, 2021, 8:55 PM IST

Updated : Sep 10, 2021, 9:10 PM IST

पुणे - नर्सचे कपडे परिधान करून ससून रुग्णालयात जात नर्स असल्याचे भासवून 3 महिन्याच्या बाळाला पळवून नेणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी (काल) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. वंदना मल्हारी जेठे (वय 24) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळ पळतांना महिला सीसीटीव्हीत कैद

याप्रकरणी अधिक माहिती अशी, की गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एक 22 वर्षीय महिला ससून रुग्णालयातील वार्ड क्रमांक 74 मध्ये दोन मुलींसह आली होती. मोठ्या मुलीची सोनोग्राफी करण्यासाठी त्या रुग्णालयात आल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास डॉक्टरांनी या महिलेला आतमध्ये बोलावल्यामुळे त्यांनी तीन महिन्याच्या छोट्या मुलीला ओळखीच्या महिलेजवळ ठेवले. याच दरम्यान नर्सच्या वेशभूषेत आलेल्या एका महिलेने बाळाला माझ्याजवळ द्या, म्हणत तिच्याकडून बाळ घेतले. त्यानंतर बाळाचे अपहरण करून पळ काढला.

दरम्यान काही वेळानंतर ही महिला सोनोग्राफी कक्षाच्या बाहेर आल्यानंतर तिला बाळ दिसले नाही. आसपास शोधाशोध केल्यानंतर तिने सुरक्षारक्षकांना विचारले. तेव्हा त्यांनी एक महिला बाळ घेऊन रिक्षातून जाताना दिसल्याचे सांगितले. तातडीने बंडगार्डन पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी सतर्कता दाखवत सीसीटीव्हीच्या मदतीने संबंधित रिक्षाचा शोध घेतला आणि रिक्षाचा पाठलाग करून बाळाची सुखरूप सुटका केली. दरम्यान आरोपी महिलेकडे अधिक चौकशी केली असता वेगळीच माहिती समोर आली. आरोपी महिला उच्चशिक्षित असून काही वर्षापूर्वी तिचे लग्न झाले होते. लग्नाच्या अनेक वर्षानंतरही मुल होत नसल्यामुळे सासरच्या मंडळींकडून तिला टोमणे मारले जायचे. हा त्रास कमी व्हावा यामुळे हे कृत्य केल्याचे सांगितले. बंडगार्डन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा - ‘ई टीव्ही भारत’ ईम्पॅक्ट : गंभीर आजाराने ग्रस्त शिवसैनिकाला मिळाला मदतीचा हात

Last Updated : Sep 10, 2021, 9:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.