ETV Bharat / city

Silver Oak Attack : शरद पवारांच्या घरावर हल्ला महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा : राजेश टोपे - सिल्व्हर ओक हल्ला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ( Silver Oak Attack ) आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाई ( Take Strict Action Silver Oak Attackers ) करण्याची मागणी केली ( Rajesh Tope On Silver Oak Attack ) आहे.

राजेश टोपे
राजेश टोपे
author img

By

Published : Apr 8, 2022, 10:42 PM IST

पुणे : आज दुपारी जी घटना शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांच्या घरासमोर घडली ( Silver Oak Attack ) आहे, ती घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारी, घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. असं मत आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी आज पुण्यात बोलताना व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर आजची घटना जाणीवपूर्वक घडवण्यात आली असून, ज्यांनी हे सगळं केलं त्या लोकांवर कठोर कारवाई ( Take Strict Action Silver Oak Attackers ) करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली ( Rajesh Tope On Silver Oak Attack ) आहे.

शरद पवारांची त्यांच्याबद्दल सहानुभूती : शरद पवारांचं जर आतापर्यंतच राजकारण जर पाहिलं तर त्यांनी नेहमीच एसटी आणि एसटी कामगार यांच्याबद्दल सहानभूती दाखवली आहे. तसेच त्यांच्या प्रत्येक मागणीमध्ये शरद पवारांनी सहभाग घेतला असून, नेहमीच एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी पगारवाढ देखील जाहीर केली आहे. परंतु एसटी विलीगीकरणाचा विचार आत्तापर्यंत देखील कधीच झाला नाही. त्यात अनेक तांत्रिक अडचणी आहेत. तरीदेखील एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगला निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तो स्वीकारून आणखीन पुढे काही नवीन मार्ग काढता येतो का? हे पाहणं महत्त्वाचं होतं. परंतु घरावर दगडफेक करणं, ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो, असं स्पष्ट मत राजेश टोपे यांनी मांडलं आहे.

शरद पवारांच्या घरावर हल्ला ही घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी : राजेश टोपे

रुबी हॉल किडनी प्रकरणावर लवकरच कारवाई होणार : पुण्यातील रुबी हॉलमध्ये काही दिवसापूर्वी एक किडणी प्रकरण समोर आलं होतं. त्यावर मी पोलीस कमिशनर यांच्याशी बोलून एक समिती गठित केली असून, या समितीचा अहवाल एकाच आठवड्यात येईल. अहवाल येताच योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.