पुणे - मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना भारत-इंग्लंड संघामध्ये सामना झाला. त्यावेळी संघाचा तत्कालीन कर्णधार राहुल द्रविड याने कर्णधार असताना माझ्या बॅटिंगवर परिणाम होत आहे, म्हणून मी कर्णधार पद सोडत असल्याचे सांगितले. त्यानंतर नवा कर्णधार कोण, हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यावेळेस सचिन तेंडुलकर याने देखील कर्णधार पद भूषवण्यास नाकार दिला. त्यावेळेस त्याने एका युवा क्रिकेटरचे नाव सुचवलं आणि म्हणाला याला कर्णधार करा, हा खेळाडू देशाचे नाव उज्जवल करेल. हा खेळाडू म्हणजे महेंद्रसिंह धोनी. तेव्हा त्याला कर्णधारपद देण्यात आले. पण तेव्हा माझ्या मनात धोनीला कर्णधार करण्याबाबत शंका होती. मात्र त्यानंतर आपण सर्वांनीच पाहिले कि, महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वात भारताने काय कामगिरी केली.
एजल फेडरल लाईफ इन्श्युरन्स कंपनीच्या वतीने पद्मभूषण चंदू बोर्डे यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आला. चंदू बोर्डे यांनी भारतीय क्रिकेटसाठी म्हत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
हे ही वाचा - अनिल परबांचा किरीट सोमैयांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
मानधन एक खेळाचा भाग झाला आहे -
माझ्या सत्कारासाठी शरद पवार यांची हॅट्टरिक झाली आहे. असे बोर्डे म्हणाले. यावेळी बोर्डे यांनी अनेक क्रिकेट मॅचचे अनुभव सांगितले. इंग्लंड येथे पाकिस्तान बरोबर झालेल्या सामन्यात पाकिस्तानचे जोहर यांनी सांगितलं होतं या मॅचमध्ये जो सर्वाधिक रन करेल त्याला 10 हजार रुपये बक्षीस मिळेल, ते मला अजूनही मिळालेले नाही. आता क्रिकेटचे स्वरूप बदलले आहे. जेव्हा अशा पद्धतीने पुरस्कार आणि मानधन मिळत असतात तेव्हा खूप चांगलं वाटतं. शरद पवार यांनी क्रिकेट पटूंचे जे मानधन वाढवलं आहे. त्यामुळे त्यांचं जे टेन्शन असतं ते कमी झालं आहे. क्रिकेटमध्ये टेन्शनला खूप महत्त्व असतं. त्याचा परिणाम खेळावरही होत असतो आणि आत्ता त्यांचे टेन्शन कमी झालं आहे. मानधन हा खेळाचा एक भाग झाला आहे. त्यामुळे आपल्या पुरुष आणि महिला संघातील खेळाडू चांगल्यापद्धतीने कामगिरी करत आहेत.
हे ही वाचा - किरीट सोमैय्यांवर 250 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा होणार दाखल; विधीतज्ज्ञांचे 'हे' आहे मत
त्या काळातील सांगितले अनेक किस्से -
बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिल्लीत शतक मारल्यानंतर उचलल्याची आठवण बोर्डे यांनी सांगितली. आधी रणजी, टेस्ट तसेच वनडे क्रिकेटमधील अनेक आठवणी ते बॅट हरवलेल्या अनेक आठवणींना उजाळा यावेळी बोर्डे यांनी दिला. त्यावेळी घातक गोलंदाजी असलेल्या वेस्टइंडिज संघाच्या विरुद्ध चंदू बोर्डे यांनी 3 शतके केली होती. त्यावेळेस 50 रन करण्यासाठी खूप मेहनत करावी लागत होती. चंदू बोर्डे हे देखील त्यावेळेस संयमाने खेळत होते आणि धावा करत असत, अशा आठवणी देखील विविध मान्यवरांनी सांगितल्या.