पुणे - राज्यातील अनेक ठिकाणी काल (शनिवारी) रात्रीच्या सुमारास सगळ्यांना चकित करणारी एक घटना घडली आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश भागात आकाशातून लाल रंगाच्या जळणाऱ्या काही वस्तू खाली येताना दिसून आले. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली. अनेकांनी आपआपल्या परिने अंदाज लावत उल्कापात झाल्याची चर्चाही रंगल्याची पाहायला मिळाली. चंद्रपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये रात्री साडे सात ते आठच्या सुमारास अवकाशात प्रवाही लाल प्रकाश दिसल्याने नेमका प्रकार काय? असा प्रश्न सर्वांना पडला होता. या सर्व प्रकारावर पुण्यातील नासाच्या स्पेस एज्युकेटर आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ लीना बोकील यांनी प्रतिक्रिया देत काल घडलेली घटना नक्कीच उल्कापाताची नव्हती. ही घटना नैसर्गिक नसून मानवनिर्मित होती, असे स्पष्ट मत लीना बोकील यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - उपग्रहाचे जळलेले तुकडे लाडबोरीला पडले; अभ्यासकांनी केली पाहणी