ETV Bharat / city

रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक करणाऱ्याला अटक

author img

By

Published : Feb 3, 2021, 5:44 PM IST

ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना फोन करून, डॉक्टर बोलत असल्याचे सांगून इंजेक्शनच्या नावाखाली त्यांच्याकडून ऑनलाईन पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या एकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. अमित जगन्नाथ कांबळे असे आरोपीचे नाव आहे.

अमित जगन्नाथ कांबळे
अमित जगन्नाथ कांबळे

पुणे - ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना फोन करून, डॉक्टर बोलत असल्याचे सांगून इंजेक्शनच्या नावाखाली त्यांच्याकडून ऑनलाईन पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या एकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. अमित जगन्नाथ कांबळे (वय 34) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याने आतापर्यंत अशा प्रकारचे 21 गुन्हे केले आहेत. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ससून रुग्णालयात एका लहान मुलावर उपचार सुरू होते. आरोपीने त्याच्या कुटुंबीयांना फोन करून तुमच्या मुलाला तत्काळ इंजेक्शन द्यावे लागेल. एका इंजेक्शनची किंमत सात हजार रुपये असून, असे तीन इंजेक्शन द्यावे लागतील असे सांगितले. त्यांच्याकडून ऑनलाईन वीस हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करत आरोपीला अटक केली.

रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक करणाऱ्याला अटक

आरोपी सराईत गुन्हेगार

आरोपी हा जस्ट डायल वरून एखाद्या रुग्णालयाचा संपर्क क्रमांक मिळवायचा. त्यानंतर रुग्णालयात फोन करून डॉक्टर बोलत असल्याचे सांगून एखाद्या रुग्णाची संपूर्ण माहिती आणि फोन नंबर मिळवायचा. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांच्या नंबरवर संपर्क साधून रुग्णाला इंजेक्शन द्यायचे आहे असे सांगून ऑनलाईन पैसे घ्यायचा. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे, त्याच्याविरोधात यापूर्वी शहरातील विविध पोलीस ठाण्यात 21 गुन्हे दाखल आहेत. अशाप्रकारे कोणाचीही फसवणूक झाली असल्यास त्यांनी जवळच्या रुग्णालयात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.