ETV Bharat / city

पुण्यात विदेशी युवकाकडून कोकेन जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई - विदेशी युवकाला कोकेन बाळगल्याने अटक

पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या विदेशी युवकाकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने 3 लाख 30 हजारांचे कोकेन जप्त केले आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

anti narcotics crime cell pune
अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा
author img

By

Published : Sep 4, 2020, 5:58 PM IST

पुणे- कोंढवा परिसरामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत एका विदेशी तरुणाकडून 3 लाख 30 हजार रुपये किमतीचे कोकेन जप्त केले. जेम्स हिलरी ॲसी (वय 27, बेलिसिमा अपार्टमेट, सिल्व्हर स्टार हाॅलजवळ, कोंढवा बुद्रुक, पुणे मुळ रा. मवांझा, टांझानिया, दक्षिण आफ्रिका) या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा-नोकरी लावतो, अशी थाप मारून फसवणूक करणाऱ्या बाप-लेकाला अटक

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी कोंढवा परिसरात गस्त घालत असताना एक व्यक्ती कोंढव्यातील येवलेवाडी रोड परिसरात कोकेनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता 55 ग्रॅम कोकेन मिळून आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

विदेशी युवकाकडून जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत 3 लाख 30 हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी त्या युवकाला अटक करून एक मोबाईल फोन, एक दुचाकी, आणि कोकेन असा एकूण 3 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.