ETV Bharat / city

Rahul Shrirame ED Enquiry : पुण्याचे वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे यांची ईडीकडून चौकशी

author img

By

Published : Dec 17, 2021, 10:16 AM IST

अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री ( Anil Deshmukh Case ) असताना पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचाराचा ( Police Officers Transfer Corruption ) आरोप झाला होता. पैसे घेऊन अनेकांना पोस्टिंग देण्यात आल्याचेही आरोप होते. त्याप्रकरणी पुण्याचे वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे ( DCP Rahul Shrirame ) यांची सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) ( ED Enquiry ) चौकशी करण्यात आली आहे.

राहुल श्रीराम
राहुल श्रीराम

पुणे - पुण्याचे वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे ( DCP Rahul Shrirame ) यांची काल ईडीकडून ( ED Enquiry ) चौकशी करण्यात आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात ( Anil Deshmukh Case ) राहुल श्रीरामे यांनी ईडी कार्यालयात जवाब नोंदविला आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असताना करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांसदर्भात राहुल श्रीरामे यांचा जबाब नोंदवला गेला असल्याची माहिती मिळाली आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असताना पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार ( Police Officers Transfer Corruption ) झाला होता, पैसे घेऊन अनेकांना पोस्टिंग दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात आणखी ही काही अधिकाऱ्यांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ( IAS Sitaram Kunte ) यांची देखील याआधी चौकशी झाली होती. अनिल देशमुख गृहमंत्री असताना पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाला होता, पैसे घेऊन अनेकांना पोस्टिंग दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या बदल्यांच्या संदर्भात राज्याच्या गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मि शुक्ला ( IPS Rashmi Shukla ) यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अहवाल तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल ( IPS Subodh Jaiswal ) यांना दिला होता. तर सुबोध जयस्वाल यांनी तो अहवाल गृहविभागाचे तत्कालीन अतिरीक्त मुख्य सचिव सीतीराम कुंटे यांना दिला होता. त्यानंतर सरकारनं त्या अहवालावर काहीही कारवाई केली नसल्याचा आरोप आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.