ETV Bharat / city

Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, ललित पंडित व आशा पारेख यांनी वाहिली श्रद्धांजली!

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे निधन झाले ( Lata Mangeshkar Passed Away ) आहे. त्या 92 वर्षाच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी ( Breach Candy Hospital Mumbai ) रुग्णालयात उपचार सुरु होते. मनोरंजनसृष्टीतील अनेकांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली.

Lata Mangeshkar
लता मंगेशकर
author img

By

Published : Feb 6, 2022, 7:57 PM IST

मुंबई - ‘भारत रत्न’ लता मंगेशकर यांचे ( Lata Mangeshkar Passed Away ) आज सकाळी देहावसान झाले आणि संपूर्ण देशावर शोककळा पसरली. राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह सर्वच मंत्री आणि राजकारणी यांनी देशाचे सांगीतिक नुकसान झाल्याचे सांगितली. मनोरंजनसृष्टीतील अनेकांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली.

अमिताभ बच्चन आणि लता मंगेशकर यांनी अलीकडेच ‘हम हिंदुस्तानी’, स्वातंत्र्य दिनानिमित्त एक देशभक्तीपर गाणं, करताना एकत्र काम केलं होतं. अमिताभ बच्चन पूर्वी एकदा बोलले होते की, 'मला शेजारच्या राष्ट्रातील अनेक लोक भेटत असतात आणि ते सर्व सांगतात की, ‘आमच्याकडे तुमच्यासारखं सर्वकाही आहे. फक्त दोन गोष्टी नाहीयेत आणि त्या म्हणजे ताज महाल आणि लता मंगेशकर”. लता दीदींच्या निधनाबद्दल शोक प्रकट करताना अमिताभ म्हणाले, ‘ती आम्हाला सोडून गेली.. लाखो शतकांचा आवाज आम्हाला सोडून गेला.. तिचा आवाज आता स्वर्गात गुंजतोय! तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना..”.

लता मंगेशकर यांनी आशा पारेख यांच्यासाठी आजा 'पिया तोहे प्यार दूं, अच्छा तो हम चलते हैं, कितना प्यारा वादा, अब आन मिलो सजना, सायोनारा सायोनारा यांसारखी अनेक गाण्यांचे पार्श्वगायन केले होते. पूर्वीचा काळ गाजविलेली जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनीदेखील शोकसंदेश दिला. “संपूर्ण भारताने आपली सरस्वती गमावली आहे. ती एक अद्भुत स्त्री होती. तिला भेटायला जावे असे नेहमी वाटत असे परंतु जाणं जमलं नाही. मला खरच वाईट वाटत आहे. तिने माझ्यासाठी खूप हिट गाणी गायली आहेत. आमची सरस्वती आज गेली. देव तिच्या आत्म्याला चिरशांती दे..." असे आशा पारेख यांनी सांगितले.

सौंदर्यवती आणि प्रतिभावान अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने ने समाज माध्यमावर दिलगिरी व्यक्त केली. “एक स्वर्गीय आवाज ज्याच्या प्रेमात आम्ही पडलो तो आता स्वर्गात प्रेम पसरविण्यासाठी पोहोचला आहे. लता ताईंचे गाणे वर्षानुवर्षे ऐकले, त्यांची दोन वेण्यांमधील बालसदृश प्रतिमा आठवली, जिने आमच्या हृदयात कायमचे स्थान पक्के केले आहे. तुझ्या आठवणी सदैव आमच्यासोबत असतील. आमच्या अंतःकरणातून तुमची जागा कधीच रिकामी होणार नाही आणि तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. तुमच्या आत्म्याला चिरशांती लाभो.“

‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांनी देखील आपल्या संदेशात म्हटलेय की, “६ फेब्रुवारी हा आपल्यासाठी काळा दिवस आहे - या दिग्गज गायिकेने आपल्या सर्वांना गाण्यांचा खजिना दिला आहे, ती भारताची गानकोकिळा, लताजी, आपल्याला सोडून गेल्या आहेत, ज्या स्वर्गात त्यांचे दैवी संगीत चालू ठेवतील. आमचा परस्पर स्नेह होता आणि तिच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते की मला त्यांच्यासोबत काम करता आले. लता मंगेशकर हे खूप मोठं व्यक्तिमत्व आणि मोठी कलाकार आहेत. मी २०० चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्यांनी गायलेल्या हिट गाण्यांवर मला परफॉर्म करता आले त्याबाबत मी स्वतःला नशीबवान समजते. त्यांच्यासारखे कोणीही गाऊ शकत नाही, त्या खूप खास होत्या. त्यांचे निधन खूप दुःखदायक आहे."

जतीन-ललित या संगीतद्वयीपैकी ललित पंडित यांना विश्वासच बसत नव्हता की लता दीदी आपल्यात नाहीयेत. खरंतर त्यांचे वडील पंडित प्रताप नारायण यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकरांसोबत संगीत प्रशिक्षण घेतले होते. ते कलकत्त्याहून मुंबईत आल्यावर लता दीदींनी त्यांना नेहमीच मदत केली होती. जतीन-ललित लहान असताना तिने त्यांना खाऊपिऊही घातले होते. ते लतादीदींसोबत पंचमदा (आर डी बर्मन) यांची गाणी गात असत. जेव्हा त्यांनी म्हणजेच जतीन-ललित जोडीने संगीतकार बनण्याचे ठरविले तेव्हा लता दीदी खूप खूष झाल्या होत्या. ते इंडिया टीव्हीशी बोलताना म्हणाले, “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, जो १०००+ आठवडे चालला, बनविण्याचे प्रमुख कारण लता मंगेशकर यांचा आवाज हे होतं. आम्ही दोन दशकं त्यांच्यासोबत काम केलं ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. लता मंगेशकर एकमेवाद्वितीय होती आणि तशी गायिका पुन्हा होणे अशक्य आहे. तिच्याकडे दैवी देणगीच होती. तिची संगीताप्रती असलेली निष्ठा नेहमीच आम्ही जोपासण्याचा प्रयत्न केला.”

हेही वाचा - Lata Mangeshkar Memorable Songs : लतादिदींची संगीतकार नौशादसोबतची अजरामर गाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.