पुणे - हिंदू सणांपैकी अत्यंत महत्वाचा असलेला अक्षय तृतीया ( Akshaya Tritiya 2022 in India ) साडेतीन मुहर्तापैकी एक मुहूर्त असलेला हा सण. अक्षय तृतीयेचे महत्व म्हणजे बारा महिन्यातली ही अशी तृतीया असते ज्यात ही संपूर्ण तृतीया मानली जाते. या तृतीयामध्ये चतुर्थीचा समावेश नसतो म्हणूनच ही अक्षय तृतीया मानली जाते. यादरम्यान सोने, (Gold) चांदी (Silver) खरेदी करणे शुभ मानले जाते. अक्षय तृतीया वर्षाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. त्यामुळे यादिवशी कोणत्याही मुहूर्ताशिवाय शुभ कार्य पार पाडू शकता. म्हणजे अख्खा दिवस शुभ मुहूर्त असते. अक्षय तृतीयाच्या अनेक अख्यायिका आहेत, त्यापैकी श्रीकृष्ण तसेच भगवान परशुराम यांचा जन्म, संत बसवेश्वर यांची जयंती असे अनेक योग अक्षय तृतीयेला आलेले आहेत.
अक्षय तृतीया - भागवन श्रीकृष्ण यांनी पांडवांना एक अक्षय पात्र भेट स्वरूप दिले होते. हे असे पात्र होते जे कधीही रिकामे राहते नव्हते आणि यामुळे पांडवांना कधीची अन्नाची कमी भासली नाही. तसेच या दिवशी केलेले जप, दान, ज्ञान हे अक्षय्य फळप्राप्ती देणारे असते. म्हणून याला अक्षय्य तृतीया असे म्हणतात. भविष्यपुराण, मत्स्य पुराण, पद्मपुराण, विष्णुधर्मोत्तर पुराण, स्कंदपुराणात याचा विशेष उल्लेख केलेला आढळतो. या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे श्रेष्ठ फळ मिळते. या दिवशी देवांचे व पित्रांचे पूजन केले जाते. वैशाख महिना हा भगवान विष्णुसाठी आवडता आहे. म्हणून विशेषतः विष्णू व देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते.
अक्षय तृतीया संदर्भातील अख्यायिका - पुराणानुसार, महाभारतात एका प्रसंगी भगवान कृष्ण युधिष्ठिराला म्हणतात, ‘हे राजा या दिवशी केलेल्या दान व हवनाचा नाश होत नाही म्हणून आपल्या ऋषीमुनींनी याला ‘अक्षय्य तृतीया’ असे संबोधले आहे. या दिवशी पित्रांची व परमेश्वराची कृपा मिळवण्यासाठी केलेले काम अक्षय अविनाशी असते. ’जी माणसे सूर्योद्याच्या वेळी उठून अंघोळ करून भगवान विष्णूची पूजा करतात व कथा ऐकतात त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी दान करतात. त्यांच्या या पुण्यकार्याला देव अक्षय फळ देतो. वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी गंगेत आंघोळ करणारा माणूस सगळ्या पापांतून मुक्त होतो, असे भविष्यपुराणातील मध्यमपर्वात सांगितले गेले आहे. जे काही दान केले जाते ते अक्षय होते. विशेषतः मोदक दिल्याने व गुळ आणि कापुराच्या सहाय्याने जलदान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. अशा माणसांची ब्रम्हलोकात गणना होते. अशी अख्यायिका आहे.
अक्षय तृतीया उपवासाचे महत्त्व - वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी व मोदकाच्या दानाने ब्रम्ह तसेच सगळे देवता प्रसन्न होतात. या दिवशी अन्न, वस्त्र, सोने आणि पाण्याचे दन केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते. या दिवशी जे काही दान केले करतो ते अक्षय होते आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते. या दिवशी जो उपास करतो तो सुख-समृद्धीने संपन्न होतो.
हेही वाचा - Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयाला दान-धर्माला का आहे विशेष महत्व?; पाहा, VIDEO...