ETV Bharat / city

शरद पवार - प्रशांत किशोर भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर यांची आज मुंबईत भेट होत आहे. त्यांच्या या भेटीमागे काही राजकीय समीकरणे असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र या भेटीमागे कोणतेही राजकीय समीकरण नसल्याचा दावा केला आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अजित पवार
अजित पवार
author img

By

Published : Jun 11, 2021, 2:26 PM IST

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर यांची आज मुंबईत भेट होत आहे. त्यांच्या या भेटीमागे काही राजकीय समीकरणे असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र या भेटीमागे कोणतेही राजकीय समीकरण नसल्याचा दावा केला आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर स्वतः प्रशांत किशोर यांनी आता कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत पडणार नसल्याचे सांगितले होते. त्यांनी स्वतःहून ते क्षेत्र सोडल्याचे सांगितल्यानंतर यावर चर्चा होण्याचे काहीच कारण नाही. शरद पवारांना वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकजण भेटत असतात. त्यातीलच ही एक भेट आहे. त्यामुळे या भेटीवर चर्चा करण्याचे काहीच कारण नाही, असंही यावेळी पवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - परिवहन विभागाचा खासगी बस चालकांना ठेंगा; बस मालक सरकारवर नाराज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.