ETV Bharat / city

Ajit Pawar Demand Pm Modi : अजित पवारांनी पंतप्रधान मोदींकडे केल्या 'या' मागण्या - ajit pawar demand narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन ( PM Modi Inaugurate Pune Metro ) केले. त्यानंतर झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोच्या अन्य मार्गिकेबद्दल काही मागण्या केल्या ( Ajit Pawar Demand PM Narendra Modi ) आहेत.

Ajit Pawar
Ajit Pawar
author img

By

Published : Mar 6, 2022, 2:21 PM IST

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी मोदींनी पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचेही लोकार्पण ( PM Modi Inaugurate Pune Metro ) करण्यात आले. त्यानंतर एमआयटी महाविद्यालयात मोदींची जाहीर सभा झाली. या सभेत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यांचे भाषण झाले. यावेळी अजित पवारांनी पंतप्रधानांकडे काही मागण्या केल्या ( Ajit Pawar Demand PM Narendra Modi ) आहेत.

अजित पवार म्हणाले की, अंधेरी- घाटकोपर मार्गावर पहिली मेट्रो सुरुवात झाली. त्याचे 2006 ला भूमिपूजन झाले. ती 2019 ला सुरु झाली. पुणे मेट्रो सुरु करायला 12 वर्षे लागली. नितीन गडकरी साहेबांनी वेळोवेळी कठोर भूमिका घेतल्याने मेट्रोला सुरुवात झाली. पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना मेट्रो आणि अन्य विकासकामावेळी खूप त्रास सहन करावा लागला. अद्यापही काही काळ हा त्रास सहन करावा लागणार आहे.

अजूनही पिंपरी-स्वारगेट मार्गिकेचे काम सुरु आहे. तसे स्वारगेट ते कात्रज आणि हडपसर ते खराडी मार्गाचे आहे. या दोन मार्गिकेच्या प्रकल्पाचे काम सुरु आहे. ते काम पूर्ण करुन जसे आताच्या मेट्रोमध्ये 50 टक्के राज्य आणि 50 टक्के केंद्र आणि 10 टक्के भागिदारी महापालिकेची आहे. त्याच धर्तीवर मेट्रो सुरु करण्यासाठी आपण मदत केली. तशाच पद्धतीने आम्हालाही मदत करावी, असे आवाहन अजित पवारांनी पंतप्रधान मोदींकडे केले आहे.

यावेळी अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाव न घेता त्यांची अप्रत्यक्ष तक्रारच पंतप्रधान मोदींकडे केली. पवार म्हणाले, सन्माननीय पदावरील व्यक्ती काहीही वक्तव्य करत आहेत. राज्यपाल कोश्यारींनी औरंगाबादेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि पुण्यात महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते.

हेही वाचा - NCP Allegation PM Modi : मोदींनी आपल्या पदाचा मान राखला नाही, राष्ट्रवादीची पंतप्रधानांवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.