पुणे - गेली दोन वर्ष कोरोना मुळे सर्वानाच मोठा फटका बसला होता. तसा फटका कुंभारांना देखील बसला होता. यंदा मात्र सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याने कुंभारांनी देखील यंदा मोठ्या प्रमाणात हंडी बनवले. Dahi Handi 2022 शहरातील छोटे मोठे मंडळे तसेच लहान गोपाळ हे दोन वर्षानंतर दहीहंडी साजरी होणार असल्याने हंडी खरेदीसाठी तुटून पडले आणि गेली दोन वर्षाची कसर यंदाच्या दहीहंडीत निघाली असून यंदा मोठ्या प्रमाणात हंडी विक्री झाली असल्याचे यावेळी पुण्यातील कुंभार वाडा येथील विक्रेत्याने सांगितले.
मुसळधार पावसाचा फटका यंदा जरी दहीहंडीच्या हंडी खरेदीसाठी गर्दी होत असली तरी मागच्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका कुंभराना देखील बसला आहे. मुसळधार पावसाने मटकी हे वळवण्यात आले नाही. आणि याचा त्रास कुंभारांना बसला.पाहिजे तितके हंडी या मुसळधार पाऊसाने बनविता आले नाही. अशा परिस्थितीत कुंभारांनी पंख्या खाली हंडी सुखवली आणि त्यावर कलर करून दहीहंडी साठी हंडी तयार केली. तसेच, महागाईचा फटका देखील यंदा हंडी वर झालं असून वाढत्या महागाई मुळे हंडीच्या किंमतीमध्ये 10 टक्के एवढी वाढ झाली आहे.
![पुण्यातील कुंभार गल्लीतील माती कामगारांनी बवलेल्या वेगवेगळ्या वस्तू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-03-special-dahihandi-kumbhar-handi-vikri-avb-7210735_18082022114017_1808f_1660803017_818.jpg)
![पुण्यातील कुंभार गल्लीतील माती कामगारांनी बवलेल्या वेगवेगळ्या वस्तू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-03-special-dahihandi-kumbhar-handi-vikri-avb-7210735_18082022114017_1808f_1660803017_26.jpg)
बाजारपेठ फुलली दहीहंडी उत्सवासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांनी आणि रंगीबेरंगी, नक्षीदार दहीहंडी मडक्यांनी पुण्यातील कुंभार वाडा येथील बाजारपेठ फुलली आहे. बाजारात रंगीबेरंगी दहीहंडी विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये विविध रंगामध्ये विविध रंगाचे नक्षी आणि श्रीकृष्णाच्या प्रतिकृती हंड्यांवर तयार केल्या आहेत. मोठ्या हड्यांसोबतच त्यावर ठेवल्या जाणाऱ्या लहान हंड्यांमध्येही विविध प्रकार आहेत. त्याचबरोबर उत्सवासाठी लागणारे नारळ, विड्याची पाने, दोरी, ज्वारीच्या लाह्या, विविध फळे, शिंकाळे, हळद-कुंकू, बत्ताशे, गुलाल, बुक्का, मध, नाडा, अत्तर, अगरबत्ती, कापूर, बनावट नोटांच्या माळा, झुरमूळे, फुगे, हार, पताके आदी साहित्य बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत.
हेही वाचा - Dahi Handi दही हंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा