ETV Bharat / city

Pune Crime : कुणाल धर्मे टोळीतील 8 जणांवर 'मोक्का' कायद्यांतर्गत कारवाई

आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात काहीही सुधारणा होत नसल्यामुळे आरोपींवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कायद्याअंतर्गत (MCOCA Act) कारवाई केली आहे.

pune crime
pune crime
author img

By

Published : Jan 21, 2022, 5:13 PM IST

पुणे : अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सुतारदरा येथील कुख्यात कुणाल धर्मे याच्यासह टोळीतील 8 जणांवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कायद्याअंतर्गत (MCOCA Act) कारवाई केली आहे. आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आतापर्यंत तब्बल 66 वेळा मोक्का अंतर्गत (Pune Crime) कारवाई केली आहे.

कुणाल हेमंत धर्मे, यशराज हनुमंत शिंदे, योगेश राम दबडे , धीरज नथु कुडले, महेश शाम सातपुते, रोहित सुरेश सातपुते, संतोष निवेकर, आणि तुषार पोकळे यांच्यावर कारवाई (Pune Crime) करण्यात आली आहे. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात काहीही सुधारणा होत नसल्यामुळे आरोपींवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कायद्याअंतर्गत (MCOCA Act) कारवाई केली आहे.

मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई
कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबत पाठविला होता. पोलिस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी तो प्रस्ताव अप्पर आयुक्त राजेद्र डहाळे यांच्याकडे सादर केला. त्यानंतर आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांनी मोक्काअंतर्गत 8 जणांवर कारवाई केली आहे. आयुक्त गुप्ता यांनी आतापर्यंत मोक्का कायद्याचा अत्यंत प्रभावीपणे वापर करून आतापर्यंत 66 वेळा कारवाई केली आहे.

हेही वाचा - अट्टल दरोडेखोर आणि पोलिसांचा आमना-सामना; एक पोलीस कर्मचारी गंभीर; 9 जण अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.