पुणे - माजी विद्यार्थी मेळाव्यात ओळख झाल्यानंतर महिलेशी जवळीक वाढवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत याचा व्हिडिओ शाळेतील मित्र असणाऱ्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर व्हायरल केला. या प्रकरणी तक्रार आल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या 24 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या.
उमेश असुलाल डांगी (वय 40 वर्षे, रा. शिल्पतारा सोसायटी, आंबेगाव पठार), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भा.दं.वी. कलम 376 (2) (एन) 506 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डांगी आणि पीडित महिलेने एकाच शाळेत शिक्षण घेतले आहे. 2019 मध्ये शाळेच्या माजी विद्यार्थी मेळावा निमित्ताने पुन्हा एकत्र आले होते. यावेळी त्यांच्यात पुन्हा ओळख झाली. यावेळी शाळेतील सर्व मित्रमैत्रिणींनी मिळून एक व्हॉट्सअॅप ग्रुपही तयार केला होता. यानंतर आरोपीने पीडित महिलेशी जवळीक वाढवली आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान या संबंधाचा व्हिडिओ तयार करून त्याने काही दिवसांपूर्वी तो शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवला.
या प्रकारानंतर पीडित महिलेची मित्रपरिवारात बदनामी झाली होती. त्यामुळे पीडितेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल आरोपीचा शोध त्याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - फायनान्स कंपन्यांकडून रिक्षा चालकांना त्रास, शासनाने दिलेली रक्कम परस्पर कापली