ETV Bharat / city

पुण्यात कायद्याचा धाक दाखवणाराच बनला लाचखोर; ५० हजारांची लाच स्विकारताना पोलिसाला अटक - लाच

पुण्यात जप्‍त केलेली वाहने सोडवण्यासाठी लाच स्विकारणाऱ्या शरद लोखंडे या पोलिसाला लाचुलचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

चाकण पोलीस ठाणे
author img

By

Published : Jun 21, 2019, 6:38 AM IST

पुणे - जप्‍त केलेली वाहने सोडवण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच स्विकारणार्‍या पोलीस कर्मचार्‍याला लाचुलचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शरद लोखंडे असे या लाच स्विकारणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. तो चाकण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

चाकण पोलीस ठाणे

तक्रारदाराची २ वाहने चाकण पोलीस ठाण्यात होती. ती सोडवण्यासाठी पोलीस कर्मचारी लोखंडेने तक्रारदाराकडे १ लाख ३० हजार रूपयांची लाच मागितली. तडजोडी अंती १ लाख रूपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली. प्राप्‍त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी सापळा रचला आणि लाचेचा पहिला हप्ता ५० हजार रूपयांची लाच स्विकारताना लोखंडेला रंगेहाथ पकडले.

Intro:Anc__जप्‍त केलेली वाहने सोडविण्यासाठी 1 लाख 30 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 1 लाख रूपयांवर तडजोड झाल्यानंतर पहिला हप्‍ता म्हणून 50 हजार रूपयाची लाच स्विकारणार्‍या पोलिस कर्मचार्‍याला लाचुलचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.चाकण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या शरद लोखंडे नावाच्या पोलिस कर्मचार्‍याला अ‍ॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले आहे

तक्रारदाराची दोन वाहने चाकण पोलिस ठाण्यात होती. ती सोडविण्यासाठी पोलिस कर्मचारी लोखंडेने तक्रारदाराकडे 1 लाख 30 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 1 लाख रूपयावर सेटलमेंट झाले. दरम्यान, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
प्राप्‍त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने आज सापळा रचला. त्यावेळी पोलिस नाईक लोखंडे यांनी लाचेचा पहिला हप्‍ता म्हणून 50 हजार रूपये सरकारी पंचासमक्ष स्विकारले. त्यांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने तात्काळ ताब्यात घेतले. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीत येणार्‍या चाकण पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍याने 50000 हजाराची लाच स्विकारल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.