ETV Bharat / city

Akshay Vallaal Murder Case: पुण्यातील हत्या प्रकरण! कोण होता अक्षय वल्लाळ? वाचा सविस्तर ईटीव्ही भारतचा आढावा

पुणे शहरातील मध्यवर्ती नानापेठेतील नवा वाडा भागात पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातून एका तरुणाचा चाकूने भोसकून आणि डोक्यात सिमेंटचे ब्लॉक घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली होती. ( Akshay Vallaal Murder Case ) यात अक्षय लक्ष्मण वल्लाळ (वय २८, रा. नवा वाडा, नाना पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अतिशय भयानक पद्धतीने वल्लाळ याच्यावर वार करून त्याच्या हत्या करण्यात आली होती. कोण आहे अक्षय?, काय आहे नाना पेठ येथील नवा वाडा येथील इतिहास?, याबाबत ईटीव्ही भारतकडून आढावा-

author img

By

Published : Jul 29, 2022, 4:49 PM IST

Updated : Jul 29, 2022, 5:03 PM IST

पुण्यातील हत्या प्रकरण!
पुण्यातील हत्या प्रकरण!

पुणे - पुण्यातील नाना पेठ येथील नवा वाड्यात 300 ते 400 घरे. या वाड्यात हिंदू पद्मशाली ( तेलगू ) समाज हा गेल्या अनेक वर्षापासून राहत आहे. या वाड्यात जवळपास या हिंदू पद्मशाली ( तेलगू ) सामजाची 4000 ते 5000 लोक राहत असत. ( Akshay Vallaal Murder Case In Pune ) आजही या समजातील महिला हे विडी कामगार म्हणून काम करतात. समजातील जुनी मंडळी गेल्या अनेक वर्षापासून हाच काम करत आहे. या वाड्यात गेल्या काही वर्षांपूर्वी एसआरएच्या माध्यमातून बिल्डिंग बांधण्यात आली आहे. तर, काही काम अजूनही प्रलंबित आहे.

पुण्यातील हत्या प्रकरण! कोण होता अक्षय वल्लाळ? वाचा सविस्त ईटीव्ही भारतचा आढावा

कोण आहे अक्षय - अक्षय वल्लाळ याचा जन्म याच वाड्यात 10 बाय 7 च्या खोलीत झाला. वडील लक्ष्मण वल्लाळ हे मूळचे भिवंडी येथील पण ते 30 वर्षापूर्वीच याच वाड्यात म्हणजेच त्यांच्या सासरी राहायला आले. आणि दोन्ही नवरा बायको हे कधी कारखान्यावर तर कधी घरीच विडी काम करू लागले. आणि ते जेव्हा दोन्ही नवरा बायको पुण्यात आले तेव्हा दोन वर्षांनी अक्षय जन्माला आला. आई-वडील अक्षय आणि एक छोटी बहिण असा अक्षयचा परिवार आहे. गेली 30 वर्ष झाले ते याच 10 बाय 7 च्या खोली मध्ये राहत आहेत.

घटनेचा व्हिडिओ

फक्त नवीन कपड्यांचा शौक, बाकी कोणताच नव्हता शौक - अक्षय हा लहान पणापासून लोकांची काम करणे शाळेत जात असताना कोणी काहीही काम सांगितल की ते करणे आणि मित्र मंडळी असा त्याचे जीवन. पुण्यातील रास्ता पेठ येथील राजा धनराज गिरिजा स्कूल या शाळेत अक्षयने शिक्षण घेतले. दहावीमध्ये दोन वेळा नापास झाला म्हणून त्याने शाळा सोडली आणि त्यानंतर आई वडिलांना मदत व्हावी तो कामाला लागला. सुरवातीला त्याने इलेक्ट्रॉनिक म्हणून काम केले त्यानंतर तो चारचाकी गाडी चालवायला लागला, पण नंतर तो एका कपड्याच्या दुकानात काम करू लागला.

शहरातील विविध ठिकाणी देखील त्याचे मित्र मंडळी - काम करून रात्री 9 ते 10 वाजल्याचा सुमारास तो घरी आला की लगेच जेवण करायचं आणि बाहेर मित्र मंडळीमध्ये जायचा. सामाजिक कामाची आवड असल्याने अक्षयचे फक्त नवा वाडा येथेच मित्र मंडळी नव्हती तर शहरातील विविध ठिकाणी देखील त्याचे मित्र मंडळी असायचे. अक्षयला कोणतीच वाईट सवय नव्हती फक्त एक सवय होती ती म्हणजे कपड्यांची. 10 बाय 7 च्या घरात कपाट भरून त्याच्याकडे कपडे होते.

वर्चस्व किशोरला वारंवार खटकत होते - अक्षय हा रात्री उशिरापर्यंत मित्र मंडळींमध्ये बसायचा. मित्रांच्या अडी-अडचणीला धावून जाणारा सच्चा मित्र म्हणून त्याची ओळख. अक्षय वल्ल्याळ, किशोर शिंदे, महेश बोरा हे तिघेही नाना पेठ नवा वाडा येथ राहणारे जिगरी मित्र. पण सहा महिन्यांपूर्वी त्यांच्याच मित्रांमध्ये पाणी फेकण्यावरून एक छोटीशी भांडण झाली आणि ती भांडण अक्षयने सोडवली. त्याचा समाजात वाढत असलेला वर्चस्व हेच महेश आणि किशोर ला खटत होता. समाजात अक्षयची प्रतिमा ही चांगली होती. कोणाच्याही हाकेला धावणारा म्हणून अक्षयांची ओळख. नाना पेठ येथील नवा वाडा येथे राहणारे यांचे अनेक मित्र हे अक्षयलाच प्राधान्य द्यायचे. आणि हेच वर्चस्व किशोरला वारंवार खटकत होते. आणि यातूनच वाढत असलेला मनातला राग हा टोकाला गेला.

काय घडल त्या दिवशी - अक्षय ची आई विजया वल्लाळ ही विडी कामगार असून ती आजही विडी चां काम घरीच करते. 25 जुलै रोजी रात्री 11 वाजता अक्षय हा घरी आला आणि थोडसं जेवला आणि आईला म्हटलं की मला मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बाहेर जायचं आहे म्हणून तो लगेच बाहेर निघाला आणि घराला बाहेरून कडी मारली.बरोबर 1 वाजता तो त्याच्या गाडी जवळ बसलेला होता.आणि त्याचे मित्र त्याच्या सोबत होते.तेव्हा त्याच्या मनात शंका आली की 6 महिन्यांपूर्वी ज्या मित्राबरोबर भांडण झाली त्यांना त्याने घरी पाठवल.आणि तो किशोर शिंदे ,महेश बोरा यांच्या सोबत थांबला. अन् पाहता पाहता या दोघांनी अक्षयवर सपासप 35 वार केले. हे दोघेही फक्त वार करून त थांबले नाहीत. किशोरने मोठा दगड उचलून अक्षयच्या डोक्यात घातला. यातच अक्षयचा मृत्यू झाला. मात्र दोन मित्रांची मनातली कुजबुज ही त्यांच्याच मित्राच्या जीवावर बेतली.

हेही वाचा - CM Visit To Delhi: मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीची चर्चा जोरात! मात्र, दौरा केलाचं नसल्याचा सरकारकडून दावा

Last Updated : Jul 29, 2022, 5:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.