ETV Bharat / city

State Commission for Women: पुणे येथे महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत जनसुनावणी होणार

राज्य महिला आयोगाकडून (State Commission for Women) ‘महिला आयोग आपल्या दारी’ (Women Commission as part of its door to door activities) उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात १९ ते २१ जुलै दरम्यान जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड येथे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Commission Chairperson Rupali Chakankar) तक्रारींची सुनावणी घेणार आहेत.

author img

By

Published : Jul 17, 2022, 7:48 PM IST

Commission Chairperson Rupali Chakankar
आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

पुणे: राज्य महिला आयोगाकडून (State Commission for Women) ‘महिला आयोग आपल्या दारी’ (Women Commission as part of its door to door activities) उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात १९ ते २१ जुलै दरम्यान जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड येथे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Commission Chairperson Rupali Chakankar) तक्रारींची सुनावणी घेणार आहेत.

पुणे शहर भागातील तक्रारींची जनसुनावणी १९ जुलै रोजी, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. पुणे ग्रामीण मधील तक्रारींवर २० जुलै रोजी, सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनसुनावणी होणार आहे. तर २१ जुलै रोजी, पिंपरी-चिंचवड येथील तक्रारींची सुनावणी ज्ञानज्योती सावित्री बाई फुले स्मारक येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा. यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी उपक्रम' राबविण्यात येत आहे. या जनसुनावणीवेळी पोलीस प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित असणार आहे.

महिला सक्षमीकरणाबरोबरच महिलांना व्यवहारात आणण्याची गरजः महिलांना सुरक्षित वातावरणामध्ये काम करता येणं, तिला तिचे निर्णय घेता येणं, तिचं अस्तित्त्व मान्य करणं म्हणजे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होय, असे मत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं. राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात 25 जानेवारी 1993 रोजी राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाला 29 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणून राज्य महिला आयोगाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतने आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची विशेष मुलाखत घेतली. ( Rupali Chakankar Special Interview with ETV Bharat ) यावेळी त्यांनी महिला सक्षमीकरणाबरोबरच महिलांना व्यवहारात आणण्याची आयोग कसं काम करतंय, आयोगाची धोरणे याबाबत आपली मते मांडली. तसेच यासंह अत्याचाराच्या घटना घडू नये यासाठी संस्कारांची आवश्यकता आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा:MP Bhavana Gawali : खासदार गवळींना पक्ष प्रतोद पदावरून हटवल्याने नाराजी; पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करून समर्थन पत्र लिहून दिले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.