पुणे - पुण्याच्या सुसगावमध्ये उच्चशिक्षित तरुणाने आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. अक्षय अमोल माटेगावकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ( Youth Suicide In Pune ) आत्महत्येपूर्वी अक्षयने एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यात 'मला नोकरी मिळणार नाही, मी तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही, मी माझं आयुष्य संपवत आहे' असा उल्लेख असलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे.
घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत - अक्षयने आज पहाटेच्या सुमारास आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. अक्षय आई बाबा आणि बहिनीसह राहत होता. अक्षय हा कॉम्प्युटर सायन्सच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. मात्र, अचानक त्याने आज आत्महत्या केली. नोकरीचा पर्याय नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मी अपयशी ठरलो आहे, तुमच्या इच्छा पूर्ण करू शकलो नाही. असे पत्रात उल्लेख करत अक्षयने आत्महत्या केली आहे. या घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.
हेही वाचा - Naxalites Making Missiles : इंटरनेट आणि युट्युब पाहून नक्षलवादी बनवत आहेत मिसाईल्स.. सापडले अवशेष