पुणे - शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. याची दखल पोलिसांनी घेतली असून, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच कोरोना नियमांचे उल्लंघन'
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्या उपस्थितीतच अशाप्रकारे कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम, सरचिटणीस रोहन पायगुडे माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके यांच्यासह शंभर ते दीडशे महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - 'राज्यकर्त्या राजाची पुंगी वाजवणे देशभक्ती नाही; परखड बोल सुनावणे ही खरी राष्ट्रनिष्ठा'