ETV Bharat / city

A Boy Killed in Bibvewadi : बिबवेवाडीत पूर्व वैमनस्यातून तरूणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल

पूर्व वैमनस्यातून एका 21 वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून झाला ( A Boy Killed in Bibvewadi ) आहे. ही घटना बिबवेवाडीतील सुपर इंदिरानगर येथील सुवर्णयुग मित्र मंडळाजवळ घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाचा खून केल्यानंतर संशयित आरोपींनी त्यांच्याजवळील कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 19, 2022, 7:30 PM IST

पुणे - पूर्व वैमनस्यातून एका 21 वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून झाला ( A Boy Killed in Bibvewadi ) आहे. ही घटना बिबवेवाडीतील सुपर इंदिरानगर येथील सुवर्णयुग मित्र मंडळाजवळ घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाचा खून केल्यानंतर संशयित आरोपींनी त्यांच्याजवळील कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

योगेश रामचंद्र पवार (वय 21 वर्षे, रा. सुवर्णयूग मित्र मंडळाजवळ, सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे), असे खून झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, योगेशचा मित्र वैभव सोमनाथ घाटूळ (वय 22 वर्षे, रा. टिळेकर नगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे ) याने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी विश्वास शिंदे, नागेश फुलारे, सनी भोंडेकर, ओंकार खाटपे यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी ( Pune Police ) दिलेली अधिक माहिती अशी की, योगेश पवार, वैभव घाटूळ आणि गणराज ठाकर हे तक्रारदाराच्या मोटारसायकलवरून योगेशच्या घरी जात होते. ते सुपर इंदिरानगर येथे आले असता आरोपींनी पूर्वी झालेल्या भांडणावरून योगेशच्या दिशेने रंग फेकला. योगेशने गाडी थांबवून त्यांना जाब विचारला असता आरोपींनी त्यांच्याकडील कोयत्यांनी त्याच्यावर सपासप वार केले. दरम्यान, काही क्षणातच योगेश रक्ताच्या थारोळयात जमिनीवर पडला. त्याला तत्काळ ससून रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासल्यानंतर योगेशला मृत घोषित केले.

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र गलाडे, वरिष्ठ निरीक्षक सुनिल झावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर, सहायक निरीक्षक प्रविण काळुखे, सहायक पोलीस निरीक्षक किरण देशमुख, उपनिरीक्षक यश बोराटे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण काळे, पोलीस उपनिरीक्षक संजय अदलिंग आदींनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा अधिक तपास सहायक निरीक्षक राजकुमार बरडे करत आहेत. गुन्हा केल्यापासून आरोपी फरार झाले असून बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आणि गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - Embarrassing And Shocking : कोवळ्या कळीला बाप, भाऊ, आजोबा, मामानेही सहा वर्षे उपभोगले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.