पुणे - शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. बुधवारी दिवसभरात ९३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डॉ. नायडू रुग्णालयात ६७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर कोरोनाचा संसर्ग झालेले २७ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुण्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ४३२ वर पोहोचली आहे. यापैकी १ हजार १२१ अॅक्टीव्ह केसेस आहेत. दरम्यान, पुण्यातील एका नगरसेविकेला आणि तिच्या पतीला कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्या मुलीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोना संकटाच्या काळात या नगरसेविका आणि त्यांचे पती सर्वसामान्य जनतेची मदत करत होते. यादरम्यान, पॉझिटिव्ह रुग्णाशी संपर्क आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे बोलले जात आहे.