ETV Bharat / city

Water Released From Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ८५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Pune rains update

पुणे शहराला पाणी पुरवठा कऱणाऱ्या चारही धरण क्षेत्रांमध्ये या आठवड्यात जोरदार पाऊस ( Heavy Rain ) झाला. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खडकवासला धरणातून ( Khadakwasla Dam ) रात्री 856 क्येसक पाण्याचा विसर्ग ( Water Released From Khadakwasla Dam ) करण्यात आला. पाणी सोडण्यात आल्याने नदी काठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा करण्यात आला आहे.

pune
pune
author img

By

Published : Jul 12, 2022, 7:11 AM IST

पुणे - रात्री १२ वाजता खडकवासला धरणाच्या ( Khadakwasla Dam ) सांडव्यातून ८५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग ( Water Released From Khadakwasla Dam ) करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासना मार्फत करण्यात आले आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार ही धरणात पावसाने दमदार हजेरी ( Heavy Rain ) लावली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.

संततधार पाऊस - 8 दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पानशेत, टेमघर, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणामधील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ होत आहे. यामुळे पुणेकर नागरिकांची पाणी संकटातून सुटका झाल्याचे म्हणावे लागेल. तसेच या चार ही धरणात जोरदार पाऊस सुरू असून आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत ९.४७ टीएमसी, ३२.४८ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. या जोरदार पावसामुळे रात्री १२ वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यातून ८५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.

अनेक झाडे कोसळली - शनिवारवाडा कॉर्नर, नर्हे स्मशानभूमी जवळ, कोरेगांव पार्क, लेन नं २,कोरेगांव पार्क, लेन नं ४,बिबवेवाडी, भगली हॉस्पिटल,रास्ता पेठ, भाजी मंडई, बावधान, हॉटेल रानवारा, एरंडवणा, राजा मंत्री पार्क, रविवार पेठ, काची आळी,सदाशिव पेठ, भरत नाट्य मंदिर, कर्वे रोड, नळस्टॉप चौक,खराडी, श्री हॉस्पिटल जवळ, हडपसर, ससाणे नगर, कर्वेनगर, महिमन सोसायटी, सहकारनगर, तळजाई सर्कल आणि सोमवार पेठ, दारुवाला पुल,या १६ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.

पुण्यात पावसाचा रेड अलर्ट-जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्या नंतर मागील आठवड्यापासून राज्यभरात विविध ठिकाणी मुसळधार (Heavy rain) तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. येणारे काही दिवस राज्यभर अश्याच पद्धतीने पाऊस राहणार आहे. तर राज्यातील पालघर,रायगड, कोकण आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तसेच विदर्भातील अनेक जिल्हयात पुढील तीन दिवस रेड अलर्ट (Pune On Red Alert) देण्यात आला आहे. तर उद्या कोल्हापूर येथे देखील अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडुन (Meteorological Department) देण्यात आला आहे.

हेही वाचा-Rain In Himachal: हिमाचलमध्ये पावसाचा जोर वाढला; काही ठिकाणी वाहणे गेली वाहून

हेही वाचा-Horrible Scene After Rain : गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार!; वलसाड येथे भयावह परिस्थिती, पाहा Drone Video

हेही वाचा-Maharashtra Weather Forecast : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढचे तीन दिवस मुसळधार; रेड अलर्ट जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.