पुणे - कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोर धरणे धरले आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरावरील अनेक मागण्या आहेत. मात्र, या मागण्यांकडे महाविद्यालय प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. त्यामुळेच या विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत धरणे कायम ठेवण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
हेही वाचा - पुण्यातील कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे आंदोलन; मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप
विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या प्रशासनाची त्वरित बदली करावी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे एक हजार 250 रुपये त्वरित परत करावे, विद्यार्थ्यांचे स्टायपेंड त्वरित द्यावी, ग्रंथालय 24 तास सुरू करून कायमस्वरूपी ग्रंथपाल नियुक्त करावा, मुलींच्या वसतीगृह बांधकाम त्वरित जलदगतीने पूर्ण करावे, महाविद्यालयाचे मैदान इतर कोणालाही भाडे तत्वावर देऊ नये, उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई करू नये, अशी या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत.
शैक्षणिक सहलीचे काही विद्यार्थ्यांना पैसे मिळालेत. स्टेट बँकेत खातं वसलेल्या विद्यार्थ्यांना पैसे मिळालेत. मात्र, इतर बँकेत खाते असलेल्या विद्यार्थ्याचे पैसे राहिले असून ते लवकरच मिळेल. तर, ग्रंथपालाची जागा रिकामी असून ती लवकरच भरण्यात येईल. सीसीटीव्ही त्यांच्या सुरक्षेसाठी असून मुलांसाठी हे मैदान आहे. माञ, ते रिकामे असेल तरच भाड्याने दिले जात असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.