पुणे - आज ( शुक्रवारी ) दुपारी पुण्यातील कुमठेकर रोडवर एक धक्कादायक घटना घडली आहे. टिळक रोड व जोंधळे चौक ( Tilak Road and Jondhale Chowk hassle ) येथे 6 ते 7 जणांच्या टोळक्यांनी नागरिक व तरुणांवर कोयत्या व दगडाने मारहाण केली आहे. यात 3 गंभीर जखमी व एका पोलिसांवरही हल्ला झाला आहे. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
पुण्यातील सिंहगड परिसरातून 6 जण हे रिक्षातून पुण्याच्या मध्यभागी असलेल्या कुमठेकर रोडवर आले. तिथे दहशत मजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते टिळक रोडवर आले आणि तिथे उभे असलेल्या एका नागरिकाला कोयत्याने मारहाण केली. असे एकूण 3 जणांवर हल्ला केला. घटनास्थळी पोलीस पकडण्यासाठी गेले असता एका कर्मचाऱ्याला देखील चाव घेतला आहे. पोलिसांनी आतापर्यंत 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये 1 आरोपी हे फरार झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचा काम सुरू आहे.
हेही वाचा - क्रूरतेचा कळस.. ६ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या.. चाकूने डोळे फोडून, जीभ कापली..