ETV Bharat / city

१५ ते १८ वयोगटासाठी शहरात ५ लसीकरण केंद्रे : ३ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात - child vaccination pune

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना १५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यास अनुसरून पुणे महापालिकेचे नियोजन पूर्ण झाले आहे. नवीन लाभार्थी वयोगटासाठी कोवॅक्सिन लस देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या दृष्टीने लशीचा मुबलक साठा उपलब्ध करण्यात येत आहे.

पुणे महापालिका
पुणे महापालिका
author img

By

Published : Dec 31, 2021, 9:12 AM IST

पुणे - केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे महापालिका हद्दीतील १५ ते १८ वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाचे नियोजन केले असून या वयोगटासाठी शहरात ५ स्वतंत्र लसीकरण केंद्राचे नियोजन केल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. यासाठी १ जानेवारीपासून कोविन पोर्टलवर नोंदणी सुरु होत असल्याचेही मोहोळ म्हणाले.

शहरात पहिल्या टप्प्यात ५ स्वतंत्र लसीकरण केंद्रे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना १५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यास अनुसरून पुणे महापालिकेचे नियोजन पूर्ण झाले आहे. नवीन लाभार्थी वयोगटासाठी कोवॅक्सिन लस देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या दृष्टीने लशीचा मुबलक साठा उपलब्ध करण्यात येत आहे. शहरातील सर्व भागातील लाभार्थ्यांना लस घेता यावी, यासाठी शहरात पहिल्या टप्प्यात ५ स्वतंत्र लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे.

नव्या वर्षाच्या पाहिल्याच दिवशी लसीकरण नोंदणी करता येणार

२००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले या लसीकरणासाठी पात्र ठरले असून लाभार्थ्यांना नव्या वर्षाच्या पाहिल्याच दिवशी लसीकरण नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे कोविन हे पोर्टल किंवा एप्लिकेशन वापरावे लागणार आहे. यात ५० टक्के ऑनलाईन आणि ५० टक्के ऑफलाईन नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. शिवाय लसीकरणाला येताना लाभार्थ्यांकडे आधारकार्ड/ओळखपत्र आवश्यक असणार आहे.

लसीकरणासाठी सुरू होणारी स्वतंत्र केंद्रे

  • कै. दशरथ बळीराम भानगिरे दवाखाना, महंमदवाडी, हडपसर
  • कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ
  • कै. जयाबाई सुतार दवाखाना, कोथरूड
  • भारतरत्न स्व. राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा
  • कै. मुरलीधर लायगुडे दवाखाना, वडगाव खुर्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.