पुणे - शहरातील बहुचर्चित जम्बो कोव्हिड केअर रुग्णालयातून 33 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्ण बेपत्ता झाल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. मात्र या प्रकरणी वारंवार विचारणा करूनही रुग्णालय प्रशासन दाद देत नसल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. जोपर्यंत रुग्णालय प्रशासन मुलीची माहिती देत नाही, तोपर्यंत जम्बो कोव्हिड रुग्णालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचे या महिलेच्या आईने सांगितले.
धक्कादायक..! जम्बो कोव्हिड रुग्णालयातून 33 वर्षीय कोरोनाबाधित महिला गायब
पुण्यातील जम्बो कोरोना केअर सेंटर मधून एक कोरोनाबाधित महिला रुग्ण बेपत्ता झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तसेच कोव्हिड केअर सेंटरच्या अधिकाऱ्यांकडू या प्रकरणी दाद दिली जात नसल्याचा आरोप बेपत्ता महिलेच्या आईने केला आहे.
33 वर्षीय कोरोनाबाधित महिला गायब
पुणे - शहरातील बहुचर्चित जम्बो कोव्हिड केअर रुग्णालयातून 33 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्ण बेपत्ता झाल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. मात्र या प्रकरणी वारंवार विचारणा करूनही रुग्णालय प्रशासन दाद देत नसल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. जोपर्यंत रुग्णालय प्रशासन मुलीची माहिती देत नाही, तोपर्यंत जम्बो कोव्हिड रुग्णालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचे या महिलेच्या आईने सांगितले.
Last Updated : Sep 24, 2020, 12:27 PM IST