मुंबई - शहरातील कांदिवली परिसरात 3 वर्षीय एक मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र मुंबई पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यतातून तपास करून अवघ्या पाच तासांत तिचा शोध घेतला आहे.
3 वर्षीय मुलगी बेपत्ता -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. कांदिवलीच्या लालजीपाडा भागातून 3 वर्षीय मुलगी शुक्रवारी सकाळी 11 वाजता घराजवळून अचानक बेपत्ता झाली होती. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी थेट कांदिवली पोलीस ठाणे गाठून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. येथील मुंबई पोलिसांनी निर्भया पथक, पाळत ठेवणारे पथक आणि मुंबई पोलिसांनी स्थापन केलेल्या स्थानिक पथकाच्या मदतीने शोध कार्य सुरू केले.
अवघ्या 5 तासांच्या आत मुलीचा शोध -
पोलिसांनी बसस्थानक, रिक्षा स्टँड, गर्दीचा परिसर, बाजारपेठ आणि आसपासच्या परिसरातील इतर ठिकाणांनी मुलीचा शोध घेतला. पण कोणताही मागमूस सापडला नाही. पोलिसांनी जवळच लावलेल्या सर्व सीसीटीव्हीचा शोध घेतला. ज्यात ती मुलगी एकटी जात असल्याचे दिसुन आले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर मालाड आणि गोरेगावच्या गस्त घालून अवघ्या 5 तासांच्या आत मुलीचा शोध लावला. मुलगी बांगूरनगर भागातून सुखरूप तिच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आली आहे असे झोन 11 चे डीसीपी विशाल ठाकूर यांनी सांगितले.
हेही वाचा - VIDEO : सांगलीतील लोखंडी खुर्च्यांचा गजब प्रवास, थेट गाठले इंग्लंड..!