ETV Bharat / city

Water Discharge From Khadakwasla Dam: खडकवासला धरणातून ३ हजार ४२४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू; नागरिकांना सतर्कतेचा इशारा - धरण क्षेत्रात पडणारा पाऊस

खडकवासला धरणातून मुठा नदीत ( Mutha River ) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून खडकवासला धरणातून नदीपात्रात ३ हजार ४२४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीपात्राच्या परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Khadakwasla Dam
खडकवासला धरण
author img

By

Published : Jul 12, 2022, 3:22 PM IST

पुणे - खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून या धरणातून मुठा नदीत ( Mutha River ) सोमवारी रात्री ११.३० पासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून खडकवासला धरणातून नदीपात्रात ३ हजार ४२४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीपात्राच्या परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

धरण क्षेत्रात पावसाची नोंद - सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत टेमघर धरण ( Temghar Dam )क्षेत्रात १७० मिलिमीटर, वरसगाव धरण ( Varasgaon Dam ) परिसरात १३७ मिलिमीटर, पानशेत धरण ( Panshet Dam ) परिसरात १४१ मिलिमीटर, तर खडकवासला धरण ( Khadakwasla Dam ) क्षेत्रात ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात १०.७९ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ३७.०१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सोमवारी रात्री चारही धरणांत ९.४७ टीएमसी पाणीसाठा होता. सोमवारी रात्रीच्या तुलनेत मंगळवारी सकाळी तब्बल १.३२ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे.धरणांमधील पाणीसाठा १०.७९ अब्ज घनफूट (टीएमसी) ३७.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टक्क्यांत - टेमघर धरणातील पाणीसाठी ०.६८ टक्क्यांवरून १८.२९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर, वरसगाव धरणातील पाणीसाठी ४.३० टक्क्यांवरून ३३.५८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पानशेत धरणातील पाणीसाठी ३.८१ टक्क्यांवरून ३५.८२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर, खडकवासला धरणातील पाणीसाठी १.८६ टक्क्यांवरून ९४.०८ क्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आधी एकूण १०.७९ टक्के असणारा धरणातील पाणीसाठी हा १०.७९ टक्क्यांवरून ३७.०१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

या जिल्ह्यांसह पालघरसाठी रेड अलर्ट - कमी दाबाच्या क्षेत्रात प्रभावामुळे येत्या 14 जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा तसेच आज या जिल्ह्यांसह पालघरसाठी रेड अलर्ट जारी ( Red Alert issued In various area ) करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ( Heavy rain in Konkan and Central Maharashtra ) गृहीत धरून 'आयएमडी'तर्फे या 2 विभागांना पुढील 5 दिवसांसाठी 'ऑरेंज अलर्ट' ( Orange Alert ) जारी करण्यात आला आहे. मोठ्या पावसाचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गोव्यातील घाट रस्त्यांवर दरडी कोसळू शकतात, असा इशारा 'सेंटर फॉर सिटिझन सायन्स'च्या 'सतर्क' या उपक्रमांतर्गत देण्यात आला आहे.

काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन - धरण क्षेत्रात पडणारा पाऊस ( Rain In Catchment Area ) व आजूबाजूच्या क्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवाकामुळे पूर परिस्थिती लक्षात घेता दारे असणारे मोठ्या धरणाचे दारे केव्हाही उघडण्यात येऊ शकतात. दारे नसणारे धरणातील पाणीसाठा शंभर टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यावर नदी नाल्यातून पुराचे पाहणी वाहणार असल्याकारणाने नदीकाठावरील सर्व नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शेतात लागणारे यंत्र (अवजारे) तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी करून ठेवावी. तसेच नदीच्या काठावरील गावातील नागरिकांना नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वतःची काळजी बाळगावी.

हेही वाचा - Maharashtra weather forecast: कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.