ETV Bharat / city

Pune Crime : धक्कादायक ! कोंढव्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून

Pune Crime : पूर्ववैमनस्यातून कोंढव्यात एका तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल रात्री 8:30 वाजेच्या सुमारास भगवा चौक शिवनेरी नगर गल्ली क्रमांक 12 या ठिकाणी घडली आहे.

Pune Crime
Pune Crime
author img

By

Published : Aug 4, 2022, 9:49 AM IST

पुणे - पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पूर्ववैमनस्यातून कोंढव्यात एका तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल रात्री 8:30 वाजेच्या सुमारास भगवा चौक शिवनेरी नगर गल्ली क्रमांक 12 या ठिकाणी घडली आहे. महेश लक्ष्मण गुजर ( वय- 24 ) रा. शिवनेरीनगर विठ्ठल मंदिरा शेजारी गल्ली क्रमांक 26 असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

राज पवार आणि त्याच्या साथीदारांनी गुजर याचा खून केल्याचा संशय आहे. गुजर याच्या बहिणीची एका तरुणासोबत मैत्री झाली होती. राज पवार हा त्या तरुणाचा मित्र होता. गुजर आणि त्या तरुणात या कारणातून अनेकदा भांडणे झाली होती. त्यातूनच हा खून झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी यावेळी दिली आहे.

गुजर हा दुचाकीवरून रस्त्याने निघाला होता. त्यावेळी कोंढव्यातील भगवा चौक परिसरात दोघांनी त्याला अडवले होते. त्यात एकाने गुजर यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्यात गंभीर जखमी झाल्याने गुजर याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी धाव घेतले आहे. त्यावेळी गुजर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसून आला आहे. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा - Supreme court hearing : शिंदे फडणवीस सरकार बेकायदेशीर की कायदेशीर? आज सर्वोच्च न्यायालयातील कामकाजात असणार पहिलीच सुनावणी

हेही वाचा - Sanjay Raut : संजय राऊतांची ईडी कोठडी आज संपणार; बेल की जेल?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.