पुणे- राज्यात आज लसीकरणाचा 2 लाखाचा टप्पा पूर्ण झाला आहे. लोक आता पुढे येत असून त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. सर्व हेल्थ वर्करचे लसीकरण लवकर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंदणी सुरू आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. ते पुण्यात बोलत होते.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी नावनोंदणीसाठी पुढे यावे-
नगरपालिका, महापालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आता नावनोंदणीसाठी पुढे यावे, असे आवाहण आरोग्यमंत्री टोपे यांनी केले आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेने नावे नोंदवून घेतले पाहिजे. देशात 30 कोटी लोकांना लसीकरण होणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे. आता पुढचा टप्पाही लवकरात लवकर घेण्यात येईल, लसीकरणा दरम्यान, लसीचा संख्येत कमतरता होणार नाही. आता आरोग्यासाठी उपलब्ध साठा मिळाला आहे. सरकार योग्य पाठपुरावा करत राहील, असे टोपे म्हणाले. कोम ऑरबीड रुग्णांना 4 ते 5 महिन्यात लसीकरण केले, जाईल असेही टोपे म्हणाले.
हेही वाचा- अण्णा हजारेंचे उपोषण मागे; देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई