पुणे - ऑनलाइनच्या काळात सायबर ( Cyber Crime ) घटनादेखील तितक्याच वाढल्या आहेत. प्रत्येक माणूस दिवसातील बहुतांश वेळ हा स्मार्टफोन वापरण्यात घालतो. दिवसभरात त्याच्या मोबाइलवर मेसेजेस, कॉल येत असतात. परंतु मोबाइलचा अतिवापर कितपत सुरक्षित आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मागील काही दिवसांपासून ऑनलाइन रोडच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. 2021 या एका वर्षात पुण्यात एकूण 19 हजार 23 सायबर गुन्ह्यांची नोंद ( Record of 19 Thousand 23 Cyber Crimes Pune ) झाली आहे, अशी माहिती सायबर पोलीस निरीक्षक दगडू हाके ( Cyber Police Inspector Dagadu Hake ) यांनी दिली आहे.
एक फोन कॉल येतो आणि क्षणात बँक खाते रिकाम होऊन जाते. आपल्या अवतीभवती दररोज अशा घटना घडत आहेत. नुकत्याच संपलेल्या या वर्षामध्ये सायबर कडची आकडेवारी लक्षणीय राहिली आहे. पुण्यात गेल्यावर्षी 14 हजार 950 इतके होते. तर दोन वर्षाच्या तुलनेत 2019 साली या गुन्ह्याची संख्या 7795 इतकी होती. म्हणजे प्रत्येक वर्षी सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये ही होत असलेली वाढ चिंता वाढवणारी आहे. सायबर गुन्ह्यांत ऑनलाइन फ्रॉड ही सर्वात मोठी समस्या आहे. कारण सायबरमधील 70 टक्के गुन्हे हे जवळपास ऑनलाइन फ्रॉडमुळे झालेले आहेत. गेल्या एका वर्षात पुणे पोलिसांनी सायबर गुन्ह्यात जवळपास 6 कोटी रुपयांची रिकवरी केली आहे. एखाद्या फेक मॅसेजवर क्लिक करून किंवा एखाद्या फेक कॉलवर सहज ओटीपी घेउन देखील लाखोंचे फ्रॉड केले जात आहेत. हे सारे गुन्हे वाढताना कुठल्याही अनोळख्या लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी शेअर करू नका किंवा क्रीप्टोकरन्सी व्यवहार करताना देखील योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याची माहिती सायबरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी दिली आहे.
हेही वाचा - Woman Beat Police in Police Station : तरुणीने चौकीतच केली पोलिसांना मारहाण, गुन्हा दाखल