ETV Bharat / city

पुण्यातील मागील चोवीस तासात कोरोनाचे 18 बळी, 1838 नवे रुग्ण

पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 935 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची बाधा झालेले 35 हजार 878 रुग्ण आहेत. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 21 हजार 881 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

corona
कोरोना
author img

By

Published : Jul 19, 2020, 1:10 AM IST

पुणे - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानाच आता या आजारामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना आढळून येत आहे. मागील 24 तासात पुणे शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात तब्बल 18 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात (शनिवार) पुणे शहरात कोरोनाचे 1838 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 774 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.

पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 935 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची बाधा झालेले 35 हजार 878 रुग्ण आहेत. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 21 हजार 881 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 13 हजार 62 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील 547 रुग्ण गंभीर असून, यातील 89 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.