ETV Bharat / city

Omicron Covid variant - दिलासादायक ! आफ्रिकेतून आलेल्या १७ भारतीयांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन या (Omicron Covid Variant) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परदेशातून शहरात येणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मात्र, परदेशातून आलेल्या 17 भारतीय नागरिकांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे.

author img

By

Published : Dec 2, 2021, 3:36 PM IST

Pune muncipal corporation
Pune muncipal corporation

पुणे : आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन या (Omicron Covid Variant) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परदेशातून शहरात येणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच त्यांचे कॉन्टॅक्ट ड्रेसिंग करून चाचण्या करण्यात येत आहेत. अशाच आफ्रिका - खंडाच्या विविध देशांतून आलेल्या १७ भारतीय नागरिकांची करोना चाचणी निगेटिव्ह (Corona Report Negative) आल्या आहेत. काही प्रमाणात दिलासा व्यक्त करण्यात येत आहे.

आफ्रिकेतून बरेच प्रवासी पुण्यातही
आफ्रिकेत आढळलेल्या 'ओमायक्रॉन' व्हेरिएंटचा संपूर्ण जगाने आता धसका घेतला असून, आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावरही बऱ्याच देशांनी निर्बंध आणले आहेत. भारतातही आफ्रिकेतील विविध देशांतून प्रवासी आले आहेत. त्यातील हजारभर प्रवासी मुंबईत आले आहेत. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इच्छितस्थळी गेले आहेत. बरेच प्रवासी पुण्यातही आले आहेत.

झांबियामधून आलेल्या नागरिकाला कोरोनाची लागण
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन विषाणूमुळे जगभरात घबराट पसरली आहे. यामुळे देशात खबरदारीचा उपाय म्हणून अनेक निर्बंध वाढवण्यात आले आहेत. त्यातच झांबियामधून आलेल्या एका नागरिकाला कोरोनाची लागण झाली असून, ओमायक्रॉन या कोरोना विषाणूची जनुकीय रचना तपासण्यासाठी द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.

१७ जणांची 'आरटी-पीसीआर' टेस्ट निगेटिव्ह
मात्र, महापालिका प्रशासनाने शोधून काढलेल्या अन्य प्रवाशांमधील १७ जणांची 'आरटी-पीसीआर' टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती, साथरोग विभागप्रमुख आणि सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली. याशिवाय अन्य प्रवास करून आलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महापालिका करत आहे.

परदेशातून 42 प्रवासी पुण्यात
पुण्यात गेल्या काही दिवसांत दुबई, इंग्लंड आणि तुर्की या देशांतून प्रवासी आले आहेत. दुबईतून २५ प्रवासी आणि १८ विमान कर्मचारी, इंग्लंडमधून १० प्रवासी आणि १० विमान कर्मचारी आणि तुर्कस्तानमधून ७ प्रवासी आणि तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विमान कर्मचारी ज्या ठिकाणी थांबले, तेथील माहिती घेण्यात येईल. त्याचबरोबर पुण्यातील प्रवाशांचीही माहिती घेण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - Sanjay Raut Allegations On BJP : …तेव्हा यांना मिरच्या का झोंबल्या नाहीत; संजय राऊतांनी सुनावले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.