ETV Bharat / city

पुण्यात गुरुवारी नव्या पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दीड हजार पार - पुणे जिल्हा कोरोना बाधित रुग्ण

गुरुवारी दिवसभरात 675 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर गुरुवारी 13 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 6 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या 357 कोरोनाबाधित रुग्ण गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Breaking News
author img

By

Published : Mar 12, 2021, 9:25 AM IST

पुणे - शहरात गुरुवारी(11 मार्च) दिवसभरात एकूण 1504 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्याची परिस्थिती पुन्हा बिघडत असल्याची चिन्ह आहेत. बुधवारी देखील पुणे शहरात 1352 नवे रुग्ण आढळले होते. हा आकडा पाहता शहरात एक दिवसात दीडशे नव्या रुग्णांची अधिकची वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अधिक सतर्कता बाळगून खबरारी घेण्यात येत आहे.

गुरुवारी दिवसभरात 675 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर गुरुवारी 13 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 6 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या 357 कोरोनाबाधित रुग्ण गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पुण्यातील कोरोना आकडेवारी-

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 2 लाख 13 हजार 25 इतकी झाली आहे. त्यापैकी एकूण ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 8451 इतकी आहे. तर एकूण मृत्यू 4917 झाले आहेत.
आजपर्यंतच एकूण 1 लाख 99 हजार 567 इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान गुरुवारी 8553 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.