पुणे - पुण्यामधून दिल्लीला जाणाऱ्या विमानामध्ये पुणे विमानतळावर ( Pune Airport ) 135 प्रवाशांना जवळपास 40 मिनिटे विमानामध्ये बसून त्यांना कोणतेही कारण न देता खाली उतरवण्यात आलेले ( 135 passengers deboarded )आहे. विमानामधील प्रवाशांनी क्रू-मेंबर्सना ( Crew-members ) कारण विचारले असता त्यांनी कोणतेही उत्तर न देता ग्राउंड स्टाफ त्याचे उत्तर देऊ शकतो असे म्हटले. त्यानंतर त्यांना खाली उतरवण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी पुणे विमानतळावर ही घटना घडली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप ( Anger Among Passengers ) व्यक्त होत आहे.
चाळीस मिनिटे बसवून ठेवले - पुण्यामधून सायंकाळी 5:45 ला हे विमान दिल्लीकडे ( Pune to Delhi Flight ) जाणार होते. रात्री आठ वाजता हे विमान दिल्लीमध्ये पोहोचणे अपेक्षित होते. विमानतळावरील सर्व चेकिंग करून प्रवासी पाच वाजता विमानामध्ये बसले होते. विमानाची वेळ झाल्यानंतरही विमान सुरू होत नव्हते. त्यामुळे काही प्रवाशांनी क्रू मेंबर्सना विचारणा केली. मात्र, त्यांना तेव्हा काही उत्तर देण्यात आले नाही. नंतर चाळीस मिनिटांनी उत्तर देण्यात आले. की ग्राउंड स्टाफ तुम्हाला याची माहिती देईल. मात्र त्यानंतरही त्यांना कारण दिले गेले नाही. अखेर चाळीस मिनिटे बसून प्रवाशांना खाली उतरण्यात आले.
ग्राउंड स्टाफ कडूनही उत्तर नाही - ग्राउंड स्टाफ कडूनही प्रवाशांना उत्तर देण्यात आले नाही असे एका प्रवासाने सांगितले आहे. तसेच विमान कंपनीने या प्रवाशांना 11: 45 च्या विमानाने प्रवास करण्याची सुविधा दिली होती. परंतू काही नी ती स्वीकारली, तर काहीनी नाही. अनेक प्रवाशांनी परत जाणे पसंत केले. त्यामुळे नागरिकांमध्ये विमानसेवेबद्दल प्रचंड असा संताप व्यक्त होताना दिसत आहे. दरम्यान अजूनही या घटनेमागच कारण समजू शकलेले नाही.