पुणे - लॉकडाऊनमुळे अनेक राज्यातून कामगार पुणे विभागामध्ये अडकलेले होते. यांना परत त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी एक महत्त्वकांक्षी योजना राबवण्यात आली. यानुसार १ लाख ५८ हजार लोकांना स्थलांतरीत करण्यात आलंय. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, मणीपूर आणि आसाम, ओडिशा या राज्यामधील 1 लाख 58 हजार 81 प्रवाशांना घेऊन पुणे विभागातून 23 मे अखेर 118 विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 15, उत्तरप्रदेशसाठी 56, उत्तराखंडसाठी 1, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 24 , हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी 5, छत्तीसगडसाठी 5, जम्मू आणि काश्मिर साठी 1, मणिपूरसाठी 1, आसामसाठी 1, ओरीसासाठी 1 अशा एकूण 118 रेल्वेगाडया 1 लाख 58 हजार 81 प्रवाशांना घेऊन रवाना झाल्या आहेत.