ETV Bharat / city

Pune Crime : नायजेरियन जोडप्यांकडून कोट्यावधी रुपयांचे कोकेन जप्त; दोघांना अटक - कोकेन जप्त पुणे पोलीस

पुण्यात एका नायजेरियन जोडप्याकडे अंमली पदार्थ आढळले आहे. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी उगुचुकु इम्पॅन्युअल ( वय ४३ वर्षे, रा. नालंदा गार्डन सीडन्सी, बाणेर पुणे, मूळ देश नायजेरियन ) व त्याची पत्नी ऐनीबेली ओमामा व्हिवान ( वय, ३० वर्षे ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या नायजेरियन जोडप्यांची नावे आहेत.

जप्त केलेले कोकेन
जप्त केलेले कोकेन
author img

By

Published : Jul 26, 2022, 7:08 PM IST

पुणे - पुणे पोलिसांनी कोकेन, एमडी अशा प्रकारच्या अंमली पदार्थ विक्री प्रकरणी एका नायजेरियन जोडप्याला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी उगुचुकु इम्पॅन्युअल ( वय ४३ वर्षे, रा. नालंदा गार्डन सीडन्सी, बाणेर पुणे, मूळ देश नायजेरियन ) व त्याची पत्नी ऐनीबेली ओमामा व्हिवान ( वय, ३० वर्षे ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या नायजेरियन जोडप्यांची नावे आहेत. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.

बाणेर येथील नालंदा गार्डन या सोसायटीत राहणारे एक नायजेरियन जोडप घरातून कोकेन, एमडी असे अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणावर विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता त्यांच्याकडून ६४४ ग्रॅम (एमडी) मॅफेड्रॉन किंमत ९६, ६०,००० व २०१ ग्रॅम १२० मिलीग्रॅम कोकेन किंमत ३०,१६,८०० व रोख रुपये २१६००० मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, प्लास्टिक पिशव्या असा एकूण 1 कोटी 31 लाख 8 हजार 800 रुपयांचा अंमली पदार्थ व ऐवज हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा - बनावट मॅरेज सर्टिफिकेट करून केले व्हायरल, चंदननगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.